Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे व्हीडीओ काढून इंस्टाग्रामवर प्रसारित करणाऱ्या युवकावर राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आतिक मुख्तार सय्यद (मूळ रा. राहुरी स्टेशन, हल्ली रा. अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७४ / २०२३ नुसार भा.दं.वि. कलम ३५४ (ड) (२), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११ (४), १२ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम- २०००चे कलम ६७ (ख) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
यातील अल्पवयीन १७ वर्षीय मुलीचे सुमारे दीड वर्षांपासून आरोपी आतिक मुख्तार सय्यद याने सोशल मीडियावरून अज्ञान असल्याचा फायदा घेत व्हीडीओ कॉल करून तिला ब्लॅकमेल करून फोटो काढले व हे फोटो त्याने सोशल मीडीयावर ( इन्स्टाग्राम) प्रसारीत केले.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी त्वरित आरोपी आतिक सय्यद यास नगर येथून अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पुढील तपास करत आहेत.