पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ शाळेत निघाली क्लर्क पदासाठी नवीन भरती, वाचा सविस्तर

Ahilyanagarlive24 office
Published:

Pune Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेषता ज्या तरुणांना पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. कारण की, पुण्यातील चंदन नगर येथील वायुसेना शाळेत काही रिक्त पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

या पदभरती प्रक्रियेच्या माध्यमातून रिक्त पदांची भरती केली जाणार असून यासाठीची अधिसूचना नुकत्याच काही दिवसांपूर्वी निर्गमित करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण या शाळेत कोणत्या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे, यासाठी अर्ज कसा सादर करावा लागेल, तसेच काय पात्रता आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती

वायुसेना शाळा चंदन नगर पुणे या शाळेत मुख्य लिपिक या पदाच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता?

सदर अधिसूचनेनुसार, मुख्य लिपिक पदासाठी किमान २ वर्षे NPF मध्ये काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या फिट असणे आणि त्याला किमान 1 वर्षाचा व्यवस्थापकीय स्वरूपाचा कामाचा अनुभव असणे यासाठी आवश्यक आहे.

पदासाठी आवश्यक वयोमर्यादा

या पदासाठी 45 ते 60 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.

किती वेतन मिळणार

मुख्य लिपिक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 25 हजार रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार ?

यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना वायुसेना शाळा चंदन नगर, 9, BRD, चंदन नगर ए एफ, पुणे 411014 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. विहित कालावधीमध्ये सादर झालेल्या अर्जावरच विचार होणार आहे, त्यानंतर सादर झालेल्या अर्जावर कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

इच्छुक उमेदवारांना अर्ज करताना रिज्युमें, दहावी, बारावी आणि पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.

कुठं पाहणार जाहिरात

या पदभरतीची सविस्तर जाहिरात https://drive.google.com/file/d/1DNPI5A2ccmoLeWCpZkcJ1cN40AZGE_Mv/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन पाहता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe