Surya Gochar : सूर्याच्या संक्रमणामुळे ‘या’ राशींवर येणार वाईट वेळ, तुमचीही यात आहे का रास? वाचा

Surya Gochar

 

Surya Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा म्हणतात. सूर्य देव हे संपूर्ण महिनाभर एका राशीत राहतात, त्यानंतर ते राशी बदलत असतात. हे लक्षात घ्या की ज्या ज्या वेळी एखादा ग्रह राशी बदलत असतो त्या त्या वेळी त्याचा परिणाम इतर लोकांच्या जीवनावरही होतो.

लवकरच सूर्याचे संक्रमण होणार आहेत. परंतु त्याचा वाईट परिणाम काही राशींवर झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे या राशींनी येणाऱ्या काळात जपून राहणे खूप गरजेचे आहे. कोणत्या आहेत या राशी? जाणून घेऊयात.

सूर्याचे राशी परिवर्तनामुळे बसेल या ४ राशींना फटका

कन्या रास

ज्या व्यक्तींची रास कन्या आहे त्यांच्यासाठी सूर्याचे राशी बदल तोट्याचे असतील. तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण एखाद्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तुमचा अनावश्यक खर्च होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या भविष्यासाठी आत्तापासूनच योजना तयार करा. नाहीतर तुम्हाला येणाऱ्या काळात अडचणींचा सामना करावा लागेल.

मीन रास

मीन राशीसाठी सूर्याचे संक्रमण त्रासदायक असणार आहे. याकाळात तुमच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. असे असल्याने तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला जरूर घ्यावा. इतकेच नाही तर तरुणांना मेहनत करूनही अपेक्षित असे यश मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून तुमचे काम संयमाने करत राहावे. येणाऱ्या काळात याचा तुम्हाला फायदा होईल.

कुंभ रास

समजा तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर विशेष काळजी घ्या. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळावे. त्यामुळे तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागतील. या काळात तुमच्या नात्यात मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही तुमच्या जीवनसाथीशी बोलत असताना राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.

वृषभ रास

वृषभ रास असणाऱ्या व्यक्तींना सूर्याचे परिवर्तन विशेषतः हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. त्यांचे कुटुंब आणि व्यवसायात गतिरोध या काळात वाढू शकतो. तसेच अनावश्यक वादविवाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मासिक खर्चासाठी बजेट तयार करावे, नाहीतर या काळात तुमच्या पैशाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकेच नाही तर तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येईल.