Retirement Investment : निवृत्तीनंतर सर्वात जास्त चिंता सतावते ती म्हणजे पैशांची. अशातच भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो, जेणेकरून भविष्यात कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, तुम्हाला सध्या तुमच्या भविष्याची चिंता असेल, आणि तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टीने गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी खास योजना घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.
जेव्हा-जेव्हा निवृत्तीसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) चे नाव नक्कीच येते. NPS मध्ये गुंतवणूक करून, एखादी व्यक्ती एक मोठा फंड तयार करू शकते आणि निवृत्तीच्या चिंतेपासून मुक्त होऊ शकते, आज आपण या स्कीमबद्दच जाणून घेणार आहोत, चला तर मग…
NPS PFRDA द्वारे प्रशासित केले जाते. PFRDA ही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली एक संस्था आहे. त्यात गुंतवणूक करून मोठा पैसा जमा करता येतो. म्हणूनच ही गुंतवणूक योजना सर्वात लोकप्रिय मानली जाते.
या योजनेमध्ये सातत्यपूर्ण योगदान दिल्यास वयाच्या 60 वर्षांनंतर त्यातून 60 टक्के रक्कम काढता येईल. यामध्ये जी काही रक्कम उरते ती पेन्शन म्हणून दिली जाते. माहितीनुसार, एनपीएसमध्ये 10 टक्के रिटर्न उपलब्ध आहेत आणि यासह एनपीएसवर टॅक्स सूटचाही लाभ उपलब्ध आहे.
कोण खाते उघडू शकतो?
18 वर्षांवरील कोणीही एनपीएस खाते उघडू शकतो. त्याचप्रमाणे, तुम्ही वयाच्या 70 वर्षापर्यंत येथे योगदान देऊ शकता, म्हणजे गुंतवणूक करू शकता. यामध्ये योगदान देणाऱ्या गुंतवणूकदाराला 1 वर्षात किमान 6 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक सेवानिवृत्तीपर्यंत सुरू राहते. रिपोर्ट्सनुसार, NPS मध्ये 2 प्रकारची खाती आहेत. पहिला टियर 1 आणि दुसरा टियर 2 आहे.
जर आपण NPS च्या फायद्यांबद्दल बोललो तर, त्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण त्यात सेवानिवृत्ती निधी तयार करू शकता. यासोबतच तुम्ही करही वाचवू शकता. तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1,50,000 रुपये आणि कलम 80CCE अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त वजावट मिळू शकते.