Credit Card Scam : तुमचे क्रेडीट कार्ड चालु करु देतो, असे म्हणुन बँक खात्यावरून 45 हजारांची लुट केल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कैलासराव चिलगर हे भेंडा येथे राहत असून ते तेलकुडगाव येथे आरोग्य सेवक म्हणुन नोकरीस आहे. त्यांनी वापरासाठी क्रेडीट कार्ड घेतले असून ते कार्ड ते वापरत आहेल.
(दि. 3) ऑगस्ट रोजी सकाळी 11.20 वाजेच्या सुमारास तेलकुडगाव येथे कामावर असताना त्यांच्या मोबाईलवर एका नंबरवरून फोन आला व सदर इसम मला म्हणाला की, तुमचे एसबीआयचे क्रेडीट कार्ड बंद झाले आहे. तुम्हाला त्याचे नुतनीकरण करायचे असेल तर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो सांगा. त्यावेळेस त्यांना सदर इसमाने क्रेडीट कार्डचा नंबर सांगितला. त्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला.
त्यामुळे सदर इसमाला आलेला ओटीपी सांगितला. तसेच त्यास सांगितले होते की, मागील महिन्यात देखील जास्त पैसे भरण्यात गेले होते, असे सांगितले असता, त्या इसमाने सांगितले की, तुम्हाला पुन्हा ओटीपी येईल तो तुम्ही सांगा, असे त्याने सांगितल्याने त्यास दोन-तीन वेळेस ओटीपी सांगितला. तसेच तो इसम म्हणाला की, तुम्हाला पुन्हा संध्याकाळी फोन येईल व तुमचे कार्ड पुन्हा चालु होईल, असे त्याने सांगितले.
त्यानंतर त्याच मोबाईल नंबर वरुन त्याचा पुन्हा सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास फोन आला व त्याने मला एक लिंक पाठवली त्या लिंकवर त्यांनी मला क्लीक करण्यास सांगितले असता, त्यांनी त्यावर क्लीक केले असता, फिर्यादीच्या खात्यामधुन 9 हजार 637 रुपये व 4 हजार 998 रुपये सुमारे, असे एकुण 14 हजार 635 रुपये कपात झाले.
काही वेळानंतर लक्षात आले की सदर इसमाने त्यांची फसवणूक केली आहे. त्यानंतर एस. बी. आय शाखा यांच्याकडे जावून विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, तुमच्या क्रेडीट कार्ड मधुन एका पाठोपाठ तीन वेळा 30 हजार 395 रुपये गेले असल्याचे लक्षात आले.
तसेच माझ्या क्रेडीट कार्डवरुन 30 हजार 395 रुपये व फोन पे वरुन 14 हजार 635 रुपये, असे एकुण 45 हजार 30 रुपये फसवणूक करुन काढुन घेतले आहे. या फिर्यादीवरुन फसवणूक करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.