Ajab Gajab News : महिला पोलीस लिंगबदल करून बनणार पुरुष !

Published on -

Ajab Gajab News : मध्य प्रदेशमध्ये एक अनोखा किस्सा समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील एक महिला कॉन्स्टेबल स्वतःला पुरुष असल्याचे मानते. त्यामुळे ती गेल्या काही वर्षांपासून लिंगबदल करण्याची परवानगी सरकारकडे मागत होती.

मात्र हा प्रकार भारतात फारसा रुचणारा नाही. त्यामुळे सरकार तिला तशी परवानगी देण्यास टाळाटाळ करत होते. पण अखेर आता तिला सरकारने लिंगबदल शस्त्रक्रिया (सेक्स चेंज) करून घेण्याची परवानगी दिली आहे.

त्यामुळे लवकरच ही महिला कॉन्स्टेबल पुरुष बनणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला पोलीस कर्मचारी लहानपणापासूनच ‘जेंडर आयडेंटिटी डिस्ऑर्डर’ या मानसिक विकाराने पीडित आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी तिच्या या आजाराची पृष्टी केली आहे.

मानसोपचार तज्ज्ञांनी तिला लिंगबदल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार महिलेने राज्याच्या गृह खात्याकडे तशी लेखी विनंती करणारे पत्र पाठवले होते. यासंदर्भात गृह खात्याने विधी आणि न्याय विभागाकडे सल्ला मागितला होता.

विधी विभागाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता गृह खात्याने या महिलेला लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच ही महिला लिंगबदल करून पुरुष बनणार आहे.

मात्र त्यानंतर तिला महिला कर्मचारी म्हणून काही लाभांना मुकावे लागणार आहे. गृह विभागाने आपल्या आदेशात तसे स्पष्टपणे नमूद केले आहे. पण या महिलेला पुरुष बनायचेच असल्याने तिने ही अट मान्य केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe