Health Tips : रक्तातील साखरेची पातळी जास्त आहे, हे कसे समजेल ?

Published on -

Health Tips : आजच्या काळात मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. अनेक वेळा लोकांना त्याचे संकेत मिळत नाहीत; पण आपल्या शरीराचे काही भाग वेळेवर सिग्नल देत असतात जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते,

तेव्हा इतरअनेक आजारही घेरतात, ज्यामुळे अनेक आजारही घेरतात, ज्यामुळे शरीराचे अनेक भाग खराब होऊ लागतात. अशा परिस्थितीत मधुमेह होण्यापूर्वी तुमची रक्तातील साखरेची पातळी जास्त आहे, हे कसे समजेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

• दृष्टी कमी होणे जर तुमची दृष्टी कमी होऊ लागली किंवा तुम्हाला काही गोष्टी अंधुक दिसल्या तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे अनेक वेळा दूरच्या गोष्टी स्पष्टपणे पाहता येत नाहीत, यासाठी तुम्हाला चष्माही लावावा लागेल.

किडनीचे नुकसान होणे :- तुम्हाला तुमच्या मूत्रपिंडात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुम्हाला मधुमेह असू शकतो. मधुमेह होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. वास्तविक, जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी जास्त असते, तेव्हा किडनी नीट काम करू शकत नाही. यामुळे तुम्हाला वारंवार लघवीची समस्या होते.

हात-पायामध्ये मुंग्या येणे :- जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा धोका असतो, तेव्हा त्याच्या हात आणि पायांना मुंग्या येणे, ही पहिली चिन्हे आहेत. तुम्हालाही दर दुसऱ्या दिवशी असे वाटत असेल तर सावध व्हा. पाय सुन्न होणेदेखील साखरेच्या चिन्हात दिसून येते. कारण, मधुमेहामध्ये व्यक्तीच्या शरीरातील सा कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्त पोहोचत नाही.

जखमा लवकर न भरणे ;- जर तुमच्या शरीरात काही जखम झाली असेल आणि ती जखम लवकर बरी होत नसेल, तर समजा की, ते मधुमेहाचे लक्षण आहे. तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले आहे. जखमा भरण्यासाठी वेळ लागणे हे साखरेचे लक्षण असू शकते.

हिरड्यांतून रक्तस्राव :- हिरड्यांमधून रक्त येणे हेदेखील मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. जर तुमच्या हिरड्यांमधून सतत रक्त येत असेल तर तुम्ही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हिरड्यांमधून रक्त येते तेव्हा दुर्गंधीदेखील येऊ लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe