Ahmednagar News : तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात चुलत दिराने महिलेवर अत्याचार केला आहे. नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्याला अटक केली आहे.
घराशेजारी राहणाऱ्या चुलत दिरानेच पीडित महिलेशी अतिप्रसंग केला. मी लाईटचे काम करायला आलो असे सांगुन महिलेच्या घरात घुसला व तिच्याशी अंगलट केली. नको नको म्हणत असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला. फेब्रुवारी २०२२ पासुन ते ७ जुन २०२३ पर्यंत असले प्रकार चालु होते.
दि. ७ जुन रोजी पीडित महिला गरोदर असताना देखील तिच्यावर अतिप्रसंग केला. महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. तु घरात काही सांगितले तर तुझ्या नवऱ्याला मारुन टाकील अशी धमकी दिली. अखेर नऊ महिन्याची गरोदर असलेली महिला पोलिसात तिच्या पतीला घेवुन आली व तिने तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे तपास करीत आहेत. पश्चिम भागातील हे गाव बाजारपेठेचे आहे.
■ ज्याने अत्याचार केला त्याने महिलेच्या पतीला सांगितले की हीच्या पोटातील बाळ माझे आहे. मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. व बाळ सांभाळायला तयार आहे. तु आमच्या मध्ये येवु नकोस. नाहीतर मी तुला मारुन टाकील.. अत्याचार करुनही त्याची जाहीर कबुली देखील पतीसमोर दिल्याने हे प्रकरण अतिशय गंभीर बनले आहे.