OnePlus TV Q Series : जर घरामध्ये मोठ्या स्क्रीनचा स्मार्टटीव्ही असेल तर मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होतो. परंतु सध्याच्या वाढत्या महागाईमुळे अनेकांना महागडा स्मार्टटीव्ही घेता येत नाही. तुम्ही आता स्वस्तात 65 इंचाचा स्मार्टटीव्ही खरेदी करू शकता.
तुम्ही आता OnePlus TV Q Series 65 Q2 Pro हा स्मार्टटीव्ही आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. यावर 40% सवलत मिळत आहे. या स्मार्टटीव्हीची मूळ किंमत 159,999 रुपये इतकी आहे. परंतु सवलतींमुळे तुम्ही तो 94,999 रुपयांना खरेदी करू शकता.

तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की या सवलतीचा लाभ कुठे घेता येईल. अशा भन्नाट सवलतीचा लाभ तुम्हाला OnePlus च्या वेबसाइटवर घेता येईल. तसेच तुम्ही स्मार्टटीव्ही खरेदी करत असताना ICICI बँकेचे कार्ड वापरले तर तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंतची झटपट सवलत मिळेल.
जाणून घ्या OnePlus TV Q Series 65 Q2 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी या स्मार्टटीव्हीमध्ये 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 65-इंचाचा 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दरासह येत आहे. स्मार्टटीव्हीची सर्वोच्च ब्राइटनेस पातळी 1200 nits ही आहे. तर डॉल्बी व्हिजन सपोर्टमुळे या स्मार्टटीव्हीची चित्र गुणवत्ता आणखी सुधारते. याच्या स्टोरेजचा विचार केला तर हा टीव्ही 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. जो Google TV OS वर काम करतो .
इतकेच नाही तर पॉवरफुल साउंडसाठी कंपनी या स्मार्ट टीव्हीमध्ये 70 डब्ल्यू साउंड आउटपुट देत असून या टीव्हीमध्ये 7 स्पीकर दिले आहेत, जे डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतात. या शानदार फीचर्समुळे, टीव्हीचा आवाज एखाद्या सिनेमा हॉलसारखा बनतो.
तर कंपनीने कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये ब्लूटूथ 5, OnePlus Connect 2.0 तसेच 3 HDMI 2.1, Wi-Fi आणि दोन USB 2.0 पोर्ट आहेत. अंगभूत गुगल असिस्टंटसह सुसज्ज असणारा हा स्मार्टटीव्ही ऑक्सिजन प्ले, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब आणि हॉटस्टार यांसारख्या अंगभूत अॅप्ससह येतो.