National Pension Scheme : समजा तुम्हाला चांगला नफा मिळवायचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर एखादी गुंतवणूक करायची असल्यास तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. आता तुम्ही जास्त जोखीम नसणाऱ्या आणि जास्त नफादेखील मिळणाऱ्या योजनेत गुंतवणूक करू शकता.
या योजनेमुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला चांगली रक्कम मिळेल. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक स्वैच्छिक सेवानिवृत्ती बचत योजना आहे, अनेकजण या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. आता तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता. कसे ते जाणून घ्या.

मॅच्युरिटीवर किती रक्कम?
हे लक्षात ठेवा की नॅशनल पेन्शन स्कीममध्ये पत्नीच्या नावाने खाते चालू केले तर अनेक फायदे होतात. NPS खात्यामधून तुमच्या पत्नीला खात्याच्या मॅच्युरिटीवर म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षी एकरकमी रक्कम मिळते. इतकेच नाही तर दर महिन्याला पत्नीला पेन्शन म्हणून नियमित पैसे देखील मिळतात.
त्यामुळे खात्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पत्नीला प्रत्येक महिन्याला किती पेन्शन मिळेल हे ठरवता येईल. या गुंतवणुकीमुळे, तुमची पत्नी आणि तुमच्या कुटुंबाला वयाच्या 60 वर्षांनंतर आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
अशी करा गुंतवणूक
तुम्हाला तुमच्या सोयीनुसार प्रत्येक महिन्याला किंवा वार्षिक NPS मध्ये गुंतवणूक करता येईल. तुम्ही अवघ्या 1,000 रुपयांमध्ये हे खाते चालू करू शकता. NPS खाते वयाच्या 60 व्या वर्षी परिपक्व होते. बदललेल्या नियमांनुसार, तुम्हाला वयाच्या 65 वर्षापर्यंत NPS खात्यामध्ये गुंतवणूक करता येईल.
किती असेल पेन्शन?
जर उदाहरणाद्वारे बोलायचे झाले आणि असे गृहीत धरले की तुमची पत्नी सध्या 30 वर्षांची आहे आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात वार्षिक 60000 रुपये किंवा मासिक 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला या गुंतवणुकीवर वार्षिक 10 टक्के परतावा मिळत असल्यास वयाच्या 60 व्या वर्षी त्याच्या खात्यामध्ये एकूण 1.13 कोटी रुपये येतील. यातून त्यांना एकूण 45 लाख रुपये मिळतात. तसेच त्यांना प्रत्येक महिन्याला एकूण 45,000 रुपयांची पेन्शन मिळू शकेल. आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हे पेन्शन आयुष्यभर मिळेल.
उदाहरणाद्वारे समजून घ्या गणित
वय – 30 वर्षे
गुंतवणुकीचा एकूण कालावधी – 30 वर्षे
मासिक योगदान – रु 5,000
गुंतवणुकीवर परतावा (अंदाजे) – 10 टक्के
एकूण पेन्शन फंड – रु 1,13,96,627
अॅन्युइटी प्लॅन खरेदी करण्याची एकूण रक्कम – रु 45,58,651
अंदाजे वार्षिकी दर 8% – रु. 68,37,976
दरमहा पेन्शन – 45,000 रुपये
सुरक्षित योजना
NPS ही सरकारची सामाजिक सुरक्षा योजना असून हे लक्षात ठेवा की या योजनेतील तुमची गुंतवणूक व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित करण्यात येते. या व्यावसायिक निधी व्यवस्थापकांना केंद्र सरकारकडून जबाबदारी दिली जाते. त्यामुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. वित्तीय नियोजकांच्या मतानुसार, NPS ने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.