जमिनीचे खरेदी विक्रीचा व्यवहार हा विषय खूपच संवेदनशील असा विषय असतो. यामध्ये तुम्हाला खरेदी किंवा विक्री होत असलेल्या जमिनीचा इतिहास देखील माहिती असणे तेवढेच गरजेचे असते. कारण जमिनीचे बरेच मालक बदललेले असतात व त्याबद्दलची पुरेशी माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे असते. आता असली माहिती जर आपल्याला हवी असेल तर ती साधारणपणे तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला मिळते.
ही माहिती साधारणपणे सातबारा किंवा फेरफार उतारे व खाते उतारे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. परंतु आता शासनाच्या माध्यमातून ही सगळी माहिती सरकारने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच तुम्ही आता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून देखील संबंधित जमिनीचे जुने सातबारा, फेरफार तसे खाते उतारे ऑनलाइन पाहू शकतात. नेमके हे जुने रेकॉर्ड कसे पाहावे याबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
अशा पद्धतीने पहावे जुने रेकॉर्ड
1- अगोदर म्हणजे जुने कागदपत्र किंवा जुनी अभिलेख काढण्याकरिता तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावे लागेल. हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होते.
2- ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर ई रेकॉर्ड नावाचा एक पेज तुम्हाला दिसेल. या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषेची निवड करायची आहे.
3- त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमची नोंदणी केली नसेल तर नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यावर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी उघडलेल्या फॉर्मवर तुम्ही तुमचे सगळे वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे.
4- त्यानंतर तुम्ही करत असलेला व्यवसाय, नोकरी वगैरे इतर महत्त्वाची माहिती भरायची आहे.
5- त्यानंतर मेल आयडी आणि जन्मतारीख टाकून वैयक्तिक माहिती भरून पत्त्याविषयी देखील महत्त्वाची माहिती भरायची आहे.
6- अशाप्रकारे तुम्ही अजून बरीचशी महत्त्वाची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. अशाप्रकारे तुम्ही तुमची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लॉगिन साठी क्लिक करा असा संदेश येतो व इथे क्लिक करा या शब्दावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
1- नोंदणी करताना तुम्ही जो काही युजरनेम आणि पासवर्ड तयार केला आहे तो टाकून तुम्ही परत लॉगिन करायचा आहे.
2- त्यानंतर फेरफार उतारा पाहायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर तुमचा तालुका, गावाचे नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे व या मध्ये तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे.
3- समजा तुम्ही यामध्ये फेरफार उतारा निवडला तर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ अ चा उतारा हवा असेल तर आठ अ असा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये तुम्हाला जवळजवळ 58 अभिलेखांचे प्रकार उपलब्ध आहेत.
4- नंतर संबंधित जमिनीचा गट क्रमांक टाकून शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
5- त्यानंतर सर्च रिझल्ट म्हणजेच शोध निकाल पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांक असे संबंधित फेरफार याची माहिती दिसते.
5- यामध्ये तुम्हाला फेरफाराचे वर्ष आणि क्रमांक त्याठिकाणी दिलेला असतो. यामधून तुम्हाला कोणत्या वर्षाचा फेरफार पाहायचा आहे ते निवडावे लागते.
6- समजा तुम्हाला 2000 या वर्षाचा फेरफार पाहायचा आहे तर त्या समोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यावर क्लिक करायचे आहे व त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
7- त्यानंतर तुमचे कार्ट तुमच्यासमोर ओपन होते. त्यानंतर त्याखाली पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड सारांश नावाच एक पेज तुमच्यासमोर ओपन होते व या ठिकाणी तुमच्या फाईलचे सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे त्या समोरील फाईल पहा या पर्यावर क्लिक केलं की दोन हजार या वर्षाचा फेरफार पत्रक ओपन होईल. या पत्रकाच्या खाली जो काही बाण दिलेला असतो त्यावर तुम्ही क्लिक केलं तर ते डाऊनलोड देखील होते.
या पद्धतीने तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला तरी तुम्ही संबंधित जमिनीचे जुने सातबारे उतारे पाहू शकतात.