Corona Update India : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५१ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात ३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ही ४ कोटी ४४ लाख ६३ हजार २०६ एवढी झाली.
देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत काहीशी वाढ होऊन ती १४६८ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार २४ तासांत कोरोनाचे ५१ नवे रुग्ण आढळल्याने देशात कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या ४.४९ कोटी झाली आहे.
देशातील कोरोना बळींचा एकूण आकडा ५ लाख ३१ हजार ९२५ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.८१ टक्के, तर मृत्युदर १.१८ टक्का आहे. देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत २२०.६७ कोटींहून अधिक डोस दिल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.