Nag Panchami 2023 : आज नागपंचमीच्या या खास दिवशी अतिशय शुभ, सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. हा योग ज्योतिष शास्त्रात खूप महत्वाचा मानला जातो. ज्यांना श्रावण महिन्यात बाबा भोलेनाथांची कृपा प्राप्त होते त्यांच्यासाठी हा योग शुभ मानला जातो. नागपंचमीच्या दिवशी हाच शुक्ल योग तयार होत आहे, अशा स्थितीत हा योग अनेक राशींसाठी खूप फलदायी ठरणार आहे.
नागपंचमी हा सण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून नागदेवतेला खुश केले जाते. असे मानले जाते या दिवशी मनोभावे नागदेवतेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. यावेळी नागपंचमी सोमवार आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ संयोग असून त्याच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य खुलणार आहे. चला या राशींबद्दल जाणून घेऊया ज्यांच्यासाठी हा योग शुभ मानला जात आहे.
‘या’ राशींचे चमकेल भाग्य
मेष
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खुप खास असणार आहे. नोकरदार लोकांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तसेच व्यवसायात धनलाभाचे लक्षण आहे. कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या संधी वाढतील, ज्यामुळे आर्थिक फायदा होऊ शकतो.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा दिवस खूप शुभ ठरणार आहे. आज नागदेवतेची पूजा केल्याने करिअरमध्ये प्रगती होईल, तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. तुमच्या प्रकृतीतही सुधारणा दिसून येईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या घरात सुख-समृद्धी नांदेल
मकर
नागपंचमीला बनवलेला हा योग अतिशय फलदायी असेल. रखडलेल्या कामात यश मिळेल. मुलांकडून सकारात्मक बातमी मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. या काळात आरोग्य चांगले राहील आणि कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा सण अतिशय शुभ मनला जात आहे. जुन्या अडचणी दूर होतील. अपूर्ण कामे मार्गी लागतील. नशीबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच पैशाच्या व्यवस्थापनात आर्थिक लाभ मिळू शकतो, हा दिवस विशेषतः यशस्वी विवाह संबंधित वाटाघाटीसाठी योग्य आहे.
धनु
नागपंचमी या राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. नागपंचमीच्या दिवशी बनत असलेल्या सर्वार्थ सिद्धी योगात व्यवसायात लाभ होण्याची चिन्ह आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल आणि मानसिक स्थिती मजबूत होईल. आज करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. आर्थिक लाभाचाही योग बनत आहेत. सर्वार्थ सिद्धी योगामुळे कामात यश मिळेल. नोकरीत प्रगती होईल आणि व्यवसायातही फायदा होईल.