Jio Plans : रिलायन्स जिओ आपले अनेक पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त दैनिक डेटा, प्रतिदिन SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगचे फायदे मिळत नाही तर इतरही फायदे मिळतात. या रिचार्ज प्लॅनची किंमत वेगवेगळी असते.
असेच काही रिचार्ज प्लॅन कंपनीने आणले आहेत. ज्याची किंमत तुमच्या बजेटमध्ये येते. या प्लॅनमध्ये विनामूल्य नेटफ्लिक्स सदस्यता मिळत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचे हे प्लॅन इतर कंपन्यांना टक्कर देतात. जाणून घ्या या प्लॅनबद्दल सविस्तर.

रिलायन्स जिओचा 1,099 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह येणारा रिलायन्स जिओचा हा सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. तर 2GB दैनिक डेटा, प्रतिदिन 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगसह देखील येते. हा प्लॅन जिओ वेलकम ऑफर म्हणून अनलिमिटेड 5G डेटा देतो. जर याच्या किमतीचा विचार केला तर या रिचार्ज प्लॅनसह उपलब्ध Netflix प्लॅनची किंमत 149 रुपये प्रति महिना इतकी आहे.
रिलायन्स जिओचा 1,499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS, प्रतिदिन 2.5GB डेटा आणि 199 रुपयांचा Netflix बेसिक प्लॅन मिळत आहे. या प्लॅनमध्ये जिओ वेलकम ऑफर म्हणून अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.
रिलायन्स जिओचा 699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन हा JioPlus प्लॅन असून जो 100GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस ऑफर करतो. तसेच नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन समाविष्ट करतो. वापरकर्ते 99 रुपये प्रति वापरकर्ता 3 कनेक्शन जोडू शकतात. त्याशिवाय ग्राहकांना अतिरिक्त 5GB डेटा देखील मिळतो. कंपनीचा हा प्लॅन अनलिमिटेड 5G डेटासह येतो. हे नेटफ्लिक्स मोबाइल सबस्क्रिप्शनसह 149 रुपये प्रति महिना आणि Amazon प्राइम सब्सक्रिप्शन 1,499 रुपयांमध्ये एका वर्षासाठी येते.
रिलायन्स जिओचा 1,499 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
1,499 रुपयांचा JioPlus प्लॅन नाही, याचा अर्थ त्यात आधीच्या प्लॅनप्रमाणे अॅड-ऑन सिम सुविधा मिळत नाही. परंतु यात अनलिमिटेड कॉलिंग, 300GB डेटा, अनलिमिटेड एसएमएस आणि नेटफ्लिक्स मोबाइल सबस्क्रिप्शन 149 रुपये प्रति महिना तसेच 1 वर्षाचे अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन 1,499 रुपये देते. हे लक्षात घ्या की कंपनीचा हा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सर्वोत्तम आहे.