LIC Policy : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजना ऑफर करत असते. आता तुम्हीही LIC च्या या शानदार प्लॅनमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता.
LIC ने समाजातील प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी विमा योजना आणली आहे. जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. तुम्ही LIC च्या या योजनेत 200 रुपयांची गुंतवणूक केली तर 28 लाख रुपयांचा परतावा मिळेल. कसे ते जाणून घ्या.

मिळेल 28 लाखांचा निधी
जीवन प्रगती पॉलिसीधारकाला त्यांच्या गुंतवणुकीवर शानदार परताव्यासह आजीवन संरक्षण मिळते. समजा कोणत्याही पॉलिसीधारकाने दररोज 200 रुपये या योजनेत गुंतवणूक केल्यास तो एका महिन्यात 6000 रुपयांची गुंतवणूक करेल. जर त्याने या योजनेत 20 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर त्याला 28 लाखांची रक्कम मिळेल. तसेच तुम्हाला रिस्क कव्हरही मिळेल.
गुंतवणूक मर्यादा
जीवन प्रगती योजनेची मुदत कमीत कमी 12 वर्षे आणि जास्तीत जास्त 20 वर्षे आहे. 12 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना या योजनेत गुंतवणूक करता येते. यात तुम्हाला त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरता येतो. या पॉलिसीची कमीत कमी विमा रक्कम 1.5 लाख रुपये आहे आणि जास्तीत जास्त मर्यादा नाही.
समजा एखाद्या व्यक्तीने 2 लाख रुपयांची योजना घेतली, तर त्याचा मृत्यू लाभ पहिल्या पाच वर्षांसाठी सामान्य राहतो. यानंतर, सहा वर्षे ते 10 वर्षांसाठी कव्हरेज 2.5 लाख रुपये असणार आहे. तर 10 ते 15 वर्षांत, कव्हरेज तीन लाख रुपयांपर्यंत वाढत जातो. अशा प्रकारे पॉलिसीधारकाची व्याप्ती वाढत जाते.
जोखीम कव्हर
LIC जीवन प्रगती योजनेची खासियत म्हणजे गुंतवणूकदारांचे जोखीम कव्हर दर पाच वर्षांनी वाढ होते. याचा अर्थ तुम्हाला मिळणारी रक्कम पाच वर्षांत वाढते. या योजनेच्या मृत्यूच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, विमा रक्कम, साधा प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम बोनस एकत्रितपणे देण्यात येतात.