अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल ७ मंदिरात चोरी करणारे चौघे अटकेत !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : सात मंदिरात चोरी करणाऱ्या चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. धनंजय प्रकाश काळे (रा. रामवाडी, संवत्सर, ता. कोपरगाव), भगवान दिलीप परदेशी (रा. द्वारकानगर, शिर्डी),

अमोल लक्ष्मण पारे (रा. येवले रोड, कोपरगाव), राहुल केशरसिंग लोधवाल (रा. बेलापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडून सात मंदिराच्या गुन्ह्यातील ५० हजाराची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील राम मंदिर, कानिफनाथ मंदिर तसेच श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथील भैरवनाथ मंदिर,

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी महेश्वर मंदिर, माहेगावातील रेणुकादेवी मंदिर, तळेगावातील शनैश्वर मंदिर व भोकरधन येथील शनि मंदिरात चोरी करणारे सदरील आरोपी गजाआड करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, अमरापूरच्या रेणुकामाता मंदिरातील चोरट्यांचा शोध सुरुच आहे. लवकरच या घटनेतील आरोपी जेरबंद होतील, असे पोलिस सूत्रांच्यावतीने सांगण्यात आले.

शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील रेणुका माता मंदिरात नुकतीच चोरी झाली होती. चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून आतील १६ लाख ७६ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

या प्रकरणी पुजारी तुषार विजय वैद्य यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास वेगाने फिरविण्यात आला असता पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मात्र, वरील आरोपींनी इतर ठिकाणच्या म्हणजे ७ मंदिरात चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला. रेणुकामाता मंदिरातील चोरी प्रकरणातील आरोपींचा अद्यापही शोध लागला नसून या प्रकरणातील आरोपी लवकरात लवकर जेरबंद होतील, असे पोलिस सूत्रांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

राहुरी तालुक्यातील २, कोपरगाव तालुक्यातील ३ आणि श्रीरामपूर शहरातील १ व जालना जिल्ह्यातील भोकरधन येथील १ अशा एकूण ७ मंदिरात चोरी करणारे वरील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe