MLA Prajakt Tanpure : निवडणुकीच्या काळात जो शब्द दिला तो पूर्ण केला !

Ahmednagarlive24 office
Published:
MLA Prajakt Tanpure

MLA Prajakt Tanpure : १५ वर्षे सत्तेपासून दूर राहिलो, तरी ताहाराबादकडे पाहण्याचा तनपुरे परिवाराचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मकच राहिला आहे. माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीच्या काळात ताहाराबादकरांना जो शब्द दिला,

तो त्यांनी पूर्ण केला आहे, असे मत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केले. ६५ लाखांच्या या तिन्ही कामांची पाहणी करून सर्व कामे दर्जेदार करण्याचे आवाहन त्यांनी ठेकेदारांना केले.

ताहाराबाद येथील भैरवनाथ मंदिराच्या सभागृहाचे काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार तनपुरे यांच्याकडे केली होती. याबाबत निवडणुकीत दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला. या कामासाठी १५ लाख, तसेच संत महीपती महाराज मंदिर ते वरशिंदे फाटा रस्त्याचे खडीकरण २५ लाख व ताहाराबाद बेलकरवाडी फाटा ते बेलकरवाडी रस्त्याचे खडीकरण (सीडी वर्क) २५ लाख या तिन्ही कामांची पाहणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली. यावेळी ताहाराबादचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताहाराबाद येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून येथील भैरवनाथ मंदिरासमोर सभागृह बांधण्यात यावे, अशी मागणी सातत्याने करीत होते. आमदार तनपुरे यांनी मागील वर्षीच्या कामाच्या नियोजनात या कामाचा समावेश करून १५ लाख रुपये मंजूर केले होते. महायुतीच्या सरकारने सत्तेवर येताच या कामाला स्थगिती दिली होती.

या कामाबरोबर ताहाराबाद येथील संत महीपती महाराज मंदिर ते वरशिंदे फाटा रस्त्याचे खडीकरणाचे काम २५ लाख व ताहाराबाद बेलकरवाडी फाटा ते बेलकरवाडी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबीत होते. या रस्त्याच्या कामाचा २५१५ मध्ये समावेश करून त्या कामासाठी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.

तिन्ही कामांना महायुती सरकारने स्थगिती दिली होती. कामाना उशीर झाल्याचे सांगून कामांची पाहणी प्रसाद तनपुरे यांनी केली. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांच्या पाठपुराव्याचे कौतुक करून ताहाराबादच्या विकासासाठी प्रयत्न शील राहावे, असे आवाहन तनपुरे यांनी यावेळी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe