लघवीची चाचणी होणार आणि कॅन्सरचे निदान आता होणार आणखी सोपे !

Ahmednagarlive24 office
Published:
Health News

Health News : मेडिकल सायन्समध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीमुळे अनेक गोष्टी आता सहज साध्य होत आहेत. महिलेला गर्भधारणा झाली आहे.

किंवा नाही हे तपासण्याचा सोपा मार्ग म्हणजे युरिन टेस्ट. म्हणजे लघवीची चाचणी. आता अमेरिकेतील डॉक्टरांनी असे एक कीट विकसित केले आहे की, ज्या कीटमुळे यूरिन टेस्टमधून कॅन्सरचे निदान करणेदेखील शक्य होणार आहे.

‘नॅनो पार्टिकल सेन्सर’ असे या कीटला नाव देण्यात आले आहे. हे कीट कर्करोगाच्या पेशींची (कॅन्सर सेल्स) ओळख पटवू शकते. युरिन टेस्टप्रमाणेच या कीटमध्ये संबंधित रुग्णाच्या लघवीचे दोन थेंब टाकल्यावर या रुग्णाला कॅन्सर आहे किंवा नाही याचे निदान अगदी काही मिनिटांत होऊ शकते, असा दावा डॉक्टरांनी केला आहे.

या कीटच्या साह्याने अनेक प्रकारच्या कर्करोगाचे निदान करता येईल. त्याचबरोबर रुग्णाच्या शरीरामध्ये जर ट्यूमरची गाठ तयार होत असेल, तर त्याचीही वेळीच माहिती मिळू शकणार आहे. शरीरातील एखादी पेशी जेव्हा कर्करोगाने ग्रासली जाते तेव्हा त्या पेशीमधून डीएनएची एक श्रृंखला बाहेर पडते आणि लघवीच्या मार्गे त्याचे उत्सर्जन होते.

हाच डीएनए ओळखणारा सेन्सर या कीटमध्ये बसवण्यात आला आहे. सध्या या कीटवर पुढील संशोधन केले जात आहे. मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने या कीटचा उंदरांवर प्रयोग केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe