शेवगाव शहरातील शिवाजीनगर भागात अवैधरीत्या कुंटणखाना चालवणाऱ्या इसमावर उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांच्या पथकाने कारवाई करून अटक केली आहे. गणेश लक्ष्मण शेवगाव, असे आरोपीचे । नाव असून, कारवाई दरम्यान सहा महिला तेथे आढळून आल्या.
शेवगाव शहरातील शिवाजीनगर येथे कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, या ठिकाणी कारवाई करण्यात यावी, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना दिले.
त्यानुसार पोलिसांनी वरील ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली व छापा टाकला. आरोपी गणेश शिंदे हा त्याच्या खोलीत महिलांना पैशाचे आमिष व प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत त्याच्याविरुध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पो. नि. विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोना. बाळासाहेब नागरगोजे, पोकॉ. सागर बुधवंत, ज्ञानेश्वर उलग, वसंत वैद्य, अकोलकर, तिकोणे, पोहेकॉ. अरुणा मुंगसे, रोहिणी घरवाढवे यांनी सहभाग घेतला.