Starlink satellite : जिओ आणि एअरटेलची उडाली झोप! इलॉन मस्कचे सॅटेलाइट इंटरनेट लवकरच होणार लॉन्च

Ahmednagarlive24 office
Published:
Starlink satellite

Starlink satellite : रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन देशातील सर्वात आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. अशातच आता या दोन्ही कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी देशात लवकरच नवीन इंटरनेट सेवेला सुरुवात होत आहे.

जगप्रसिद्ध एलन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी लवकरच भारतात आपली सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सर्विस स्टारलिंक लाँच करणार आहे. यासाठी लवकरच एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. जाणून घ्या या इंटरनेट सेवेबद्धल सविस्तर माहिती.

माध्यमांच्या माहितीनुसार, देशातील स्टारलिंकला परवाना देण्याच्या पार्श्वभूमीवर DoT अधिकारी 20 सप्टेंबर रोजी बैठक घेण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्याने असे सांगितले की, कंपनीकडून परवान्यासाठी अर्ज करण्यात आला आहे, ज्याचा अर्ज विचाराधीन आहे.

दीर्घ प्रतीक्षेत आहे कंपनी

स्टारलिंक जगातील 32 देशांमध्ये आपली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवत असून कंपनी अनेक दिवसांपासून देशात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे.

ग्राहकांचे पैसे परत

या अगोदर म्हणजे 2021 मध्ये, कंपनीने कोणताही परवाना न घेता प्री-ऑर्डर घ्यायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे याबाबत दूरसंचार विभागाकडून कंपनीला फटकारण्यात आले होते. इतकंच नाही तर या कंपनीला प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना पैसे परत करावे लागले होते.

अॅप्सचे नियमन करावे लागणार?

इंटरनेट-आधारित व्हॉईस आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मला परवान्याच्या कक्षेत आणण्याबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात आले आहेत. असे ठळकपणे सांगितले जात आहे की संपूर्ण इंटरनेट बंद करण्याऐवजी, समस्याग्रस्त भागात कायदा तसेच सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी अॅप्सचे नियमन करणे हा एक चांगला पर्याय असणार आहे.

OTT अॅप्स होणार नियंत्रित

स्टारलिंकच्या परवान्याशिवाय, दूरसंचार विभाग लवकरच देशातील परवाना नियमांतर्गत OTT अॅप्स आणण्याच्या विचारात आहे. या अॅप्समध्ये Google Meet, Telegram, WhatsApp आणि इतर इंटरनेट-सक्षम व्हॉइस आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

एअरटेल आणि जिओनही केली जात आहे तयारी

एअरटेलने सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी Oneweb सोबत भागीदारी केली असून त्यासाठी कंपनीला परवाना देखील मिळाला आहे. तसेच माध्यमांच्या माहितीनुसार जिओच्या मालकीच्या जिओ स्पेस टेक्नॉलॉजीलाही GMPCS परवाना मिळालेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe