iPhone 14 : आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सवलतीत खरेदी करता येत आहे iPhone 14, अवघ्या 17999 रुपयात न्या घरी; पहा ऑफर

Published on -

iPhone 14 : आयफोन आपल्याकडे असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु सामान्य फोनपेक्षा आयफोनच्या किमती खूप महाग असतात. त्यामुळे बजेट कमी असल्याने आयफोन खरेदी करण्याचे अनेकजण टाळतात. परंतु आता तुम्ही कमी किमतीत आयफोन खरेदी करू शकता.

काही दिवसांपूर्वी कंपनीने iPhone 14 मॉडेल लाँच केले होते. जे आता तुम्ही सहज 17999 रुपयात खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. अशी शानदार ऑफर फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

स्वस्तात खरेदी करता येईल iPhone 14

iPhone 14 च्या 256GB स्टोरेज वेरिएंटवर ऑफर मिळत आहे. किमतीचा विचार केला तर iPhone 14 चा 256GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वर 77,999 रुपयांना खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या की फोनची मूळ किंमत 89,900 रुपये इतकी आहे. तर या शानदार फोनवर 11,901 रुपयांची सवलत मिळत आहे.

इतकेच नाही तर Flipkart तुम्हाला फोनवर 60,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन असेल आणि तुम्ही त्यावर संपूर्ण एक्स्चेंज बोनस मिळवू शकत असल्यास या फोनची किंमत केवळ 17,999 (₹77,999 – ₹60,000) असणार आहे.

समजा आता तुमच्याकडे HDFC बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. परंतु खरेदी करण्यापूर्वी, फ्लिपकार्ट वेबसाइटला भेट देऊन बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचे तपशील पूर्णपणे तपासून पाहावे.

जाणून घ्या फोनची खासियत

याच्या लुक्सबद्दल बोलायचे झाले तर आयफोन 14 हुबेहूब आयफोन 13 सारखा दिसत आहे. कंपनीने नवीन आयफोन मॉडेल लाँच केले असून ज्यात पूर्वीपेक्षा जास्त चांगली कॅमेरा गुणवत्ता आणि परफॉर्मन्स अपग्रेड मिळत आहे. कंपनीचा हा iPhone 14 5G ला सपोर्ट करतो.

यामध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये तळाशी चार्जिंगसाठी लाइटनिंग चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहे. तर iPhone 14 मध्ये सेल्फी कॅमेरा आणि फेस आयडी ठेवण्यासाठी एक नॉच दिले आहे, हे नॉच खूपच पातळ आहे. तर दुसरीकडे, आयफोन 14 प्रो मॉडेलमध्ये डायनॅमिक आयलंड नॉच देण्यात आलं असून जे नोटिफिकेशनच्या आधारे संकुचित होते.

इतकेच नाही तर iPhone 14 स्पोर्ट्स ड्युअल 12-मेगापिक्सेल रियर कॅमेरे आणि 12-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनच्या इतर प्रमुख फीचर्समध्ये वायरलेस चार्जिंग, iOS 17, AirDrop आणि इतर Apple उत्पादनांशी सुसंगतता यांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News