Lumpy Skin Disease : शेवगावच्या पूर्व भागासह तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेवगाव बाजार समिती तसेच उपबाजारामध्ये भरविण्यात येत असलेला जनावरांचा आठवडे बाजार शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथराक कसाळ यांनी बोधेगाव मार्केट कमिटीमध्ये बोलताना दिली.
जनावरांमधील लम्पी आजाराने काही काळ धुमाकूळ घातल्यानंतर पुन्हा आजाराने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. शेवगाव तालुक्यात ५१६ जनावरे बाधित असून, १७ जनावांचा मूळू झाला आहे. आतापर्यंत ३६३ जनावरे या आजारातून बरी झाली असून, १३६ आजारी आहेत. शेवगाव तालुक्यातील एपी सेंटरप्रमाणे बोधेगाव, शोभानगर ७०, कांबी ३४, खडका ७३, वाघोली १९, हसनापूर ७३, वरूर १०५, शहरटाकळी २२, भातकुडगाव १२०. अशाप्रकारे ५१६ जनावरांचा समावेश आहे.
जिल्ह्यात लम्मीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेवगाव तालुक्यात भरविण्यातील जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय मार्केट कमिटीने हा निर्णय घेतल्याचे मार्केट कमिटीचे सभापती कसाळ यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव दोन जनावरांचा मृत्यू
जामखेड तालुक्यात लंपी स्कीन आजाराने थैमान घातले आहे. अनेक जनावरे बाधित आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात आतापर्यंत दहा जनावरे पॉझीटीव्ह आढळून आले असुन दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून मिळाली आहे. जनावरांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शनिवारी भरणारा जनावरांचा अठवडी बाजार देखील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रशासनाकडु बंद करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यात लंपी स्कीन आजाराचा धोका मागिल वर्षीच्या तुलनेत कमी झाला असला तरी या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. जामखेड तालुक्यातील सर्व एकुण जणावरांची संख्या ७४५०० एवढी आहे. या मध्ये गायवर्गाची एकुण संख्या ५९ हजार ९५१ एवढी आहे. मागिल वर्षी ३७८१ जनावरे पॉझीटीव्ह आढळून आली होती. तर २३२ जनावरांचा मृत्यू झाला होता. या सर्व मयत २३२ जनावरांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे.
जामखेड तालुक्यात सध्या १० जनावरे लंपी स्कीनचे आढळून आले आहेत. या मध्ये चुंबळी येथे २, जमादारवाडी येथे २ व महारुळी येथे १ आशी एकुण पाच जनावरे अॅक्टीव्ह आढळून आली आहेत. तर दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जामखेड शहरात भरणारा आठवडी बाजार देखील प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे
जामखेड तालुक्यात शिल्लक राहिलेले व नवीन ज्या जनावरांचे लसीकरण झालेले नाही अशा जनावरांचा शोध सुरू आहे. तालुक्यात ज्या ठिकाणी लंपी स्कीन आजाराचे जणावरे आढळून येतील त्यांनी तातडीने जामखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मोफत उपचार करुन घ्यावेत, तसेच ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह जनावरे आढळून येत आहेत त्याठिकाणी देखील आम्ही उपचारासाठी जात आहोत.
शेतकऱ्यांनी आपला गोठा व परीसर स्वच्छ ठेवावा, पॉझीटीव्ह जनावरांना वेगळे ठेवण्यात यावे व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. असे आवाहन जामखेड पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी विस्तार अधिकारी डॉ. मच्छिद्र घोडके यांनी शेतकऱ्यांना केले आहे.