Fish Farming :- भारतामध्ये मत्स्य शेती आता मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जात असून यामध्ये देखील अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे मत्स्य शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.
माशांचे अनेक प्रकार असतात हे आपल्याला माहिती आहे. काही मासे हे गोड्या पाण्यात राहतात तर काही खाऱ्या पाण्यात राहतात. याचे वेगवेगळे प्रकार पडतात. याचा अनुषंगाने या लेखामध्ये आपण अशाच एका महत्वपूर्ण माशाच्या प्रजातीबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्याचे नाव आहे हिलसा मासा हे होय.
हिलसा मासा आहे प्रचंड महाग
हिलसा प्रजातीचा मासा हा प्रामुख्याने पश्चिम बंगाल राज्याशी निगडित असून पश्चिम बंगाल राज्यामध्ये या जातीच्या माशाला खूप महत्त्व आहे. यासोबतच बांगलादेशात देखील या माशाला खूप महत्त्व आहे आणि या जातीच्या संवर्धनासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील केले जात आहेत.
जर आपण हिलसा या मासा बद्दल पुरेशी माहिती घेतली तर ती खूप रोमांचकारक आहे. साधारणपणे 1970 च्या दशकामध्ये या माशाचे दर हे इतर माशांसारखेच सामान्य प्रमाणात होते आणि सहजतेने कुठेही उपलब्ध होत होती. परंतु 1975 नंतर हळूहळू हिलसा माशांचे बाजारपेठेतील दर वाढायला लागले. त्याच्यामागे प्रमुख कारण म्हणजे 1975 मध्ये भारत सरकारने पश्चिम बंगाल राज्यात मुर्शिदाबाद जिल्ह्यात फरका बॅरेज नावाचे धरण बांधले.
यामध्ये माशांच्या येण्या-जाण्यासाठी जो काही मार्ग ठेवला जातो तो ठेवला गेला नाही. याच कारणामुळे प्रामुख्याने हिलसा जातीच्या माशांच्या प्रजातीत घट होत गेली व बाजारपेठेत याचे दर वाढायला लागले. परंतु आता भारत सरकारने या जातीच्या संवर्धनाकरिता 360 कोटी रुपयांची तरतूद 2019 मध्ये केली. त्याच्यानंतर या जातीच्या माशांचे मत्स्यबीज तसेच शेती वाढवण्याला प्रोत्साहन दिले जात आहे.
या बॅरेज मुळे का घटली या प्रजातीच्या माशांची संख्या
हिलसा जातीच्या माशाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य असे आहे की ही जात समुद्रामध्येच राहते आणि या ठिकाणी लहानपणापासून ते प्रजनन काळापर्यंत खाऱ्या पाण्यातच राहते. परंतु प्रजनन काळानंतर पिल्ले देण्याच्या वेळेस या जातीचा मासा हा गोड्या पाण्यात जातो. पश्चिम बंगालमध्ये जर या जातीच्या माशाचा खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्याकडे जाण्याचा मार्ग पाहिला तर तो हुगळी आणि पद्मा नदीच्या मधून गंगा नदी पर्यंत असा आहे.
त्या ठिकाणी गोड्या पाण्यात ही पिल्लांना जन्म देते व त्यानंतर या प्रजातीच्या माशांची पिल्ले परत गोड्या पाण्यातून समुद्रातील खाऱ्या पाण्यात येतात. परंतु फरका बॅरेज बांधल्यामुळे या माशांच्या जातीचे जाण्या येण्याचा रस्ता बंद झाल्यामुळे या प्रजातीच्या प्रजोत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला व साहजिकच या प्रजातीच्या माशांची संख्या घटली व या प्रजातीच्या माशांचे दर वाढायला लागले.
परंतु आता भारत सरकारने 2019 मध्ये 360 कोटी रुपयांची तरतूद करून फरका बॅरेज मध्ये फिश पार्क उभारले. त्यामुळे आता या प्रजातीच्या माशाला प्रज्योत्पादनाकरिता या पार्कच्या माध्यमातून हिलसा जातीच्या माशांना गंगा नदीत जाता येते व या ठिकाणी पिल्लांना जन्म देते. सध्या या प्रजातीच्या माशांचे दर पाहिले तर ते 1000 ते 1600 रुपये प्रति किलो इतके आहेत.
हिलसा जातीच्या माशांची शेती कशी करावी?
हिलसा जातीच्या माशांची शेती करायची असेल तर ती इतर जातींच्या माशांसारखेच केली जाते. परंतु या जातीच्या माशांचे मत्स्यबीज घेण्यापासून आपल्या मत्स्यपालनाच्या ठिकाणी म्हणजेच तलावात सोडणे व पूर्ण कालावधीमध्ये या माशांची व्यवस्थित व्यवस्थापन ठेवून नंतर ते बाजारपेठेत विक्री करणे
या कालावधीमध्ये भरपूर महत्त्वाच्या गोष्टी असून हे तुम्ही देशातील काही प्रमुख मत्स्य शेतीच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतून शिकूनच करू शकतात. भारतामध्ये भारत सरकारच्या अखत्यारीतील अनेक प्रशिक्षण संस्था असून यामधून प्रशिक्षण घेऊन हिल्सा माशांची संवर्धन आणि शेती करणे खूप फायद्याचे ठरू शकते.