अहमदनगर ब्रेकिंग : आरोपीचा पोलिसांवर हल्ला ! दोन पोलिस जखमी, शासकीय गाडीचे नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याची माहिती मिळताच कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना तडीपार असलेल्या आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की करून चारचाकी गाडी अंगावर घालून हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीगोंदा शहराच्या परिसरात घडली.

या हल्ल्यात शासकीय गाडीचे नुकसान होऊन पोलिस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नदीम महम्मद कुरेशी (वय ४२ वर्षे, रा. श्रीगोंदा), ओंकार दशरथ सायकर (वय २२ वर्षे, रा. राहु, ता. दौंड, जि. पुणे), समद कादरजी कुरेशी (वय ५९ वर्षे, रा.करमाळा, जि. सोलापुर) या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, अतीक गुलामहुसेन कुरेशी (रा. कुरेशीगल्ली, श्रीगोंदा) हा तडीपार असलेला आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीगोंदा ते कर्जत रस्त्यावर कॅनॉलच्या १३ नंबर चारीजवळ एका पत्राशेडमध्ये कत्तलीकरीता गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्या नुसार पोलिसांनी खात्री करण्यासाठी गेले असता, त्याठिकाणी तडीपार असलेल्या अतीक गुलामहुसेन कुरेशी याच्यासह नदीम महम्मद कुरेशी, ओंकार दशरथ सायकर, समद कादरजी कुरेशी या चार जणांनी पोलिसांना पाहताच पोलिस गाडीचे चालक पोकॉ. दादाराम शिवराम मस्के,

आणि नवसरे याना धक्काबुक्की करुन शिवीगाळ दमदाटी करत चारचाकी स्विफ्ट गाड़ी जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्यांचे अंगावर घालुन हल्ला करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शासकीय गाडीचे नुकसान होऊन पोलिस कर्मचारी जखमी झाले.

याबाबतची माहिती पोलिस ठाण्यात मिळताच पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, संपत कन्हेरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांना पाहताच तडीपार असलेला अतीक गुलामहुसेन कुरेशी (रा. कुरेशीगल्ली,श्रीगोंदा) हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

तर नदीम महम्मद कुरेशी ( वय ४२ वर्षे, रा. श्रीगोंदा), ओंकार दशरथ सायकर (वय २२ वर्षे, रा. राहु, ता. दौंड, जि. पुणे), समद कादरजी कुरेशी ( वय ५९ वर्षे, रा.करमाळा, जि. सोलापुर) या तिघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी १२ लहान वासरे, ४ गावराण गायी यांच्यासह (एमएच १२, ई.जी. ०५०५) क्रमांकाची चारचाकी स्विफ्ट गाडी ताब्यात घेतली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe