Budhaditya Rajyog 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळाच्या अंतराने राशी बदलतो, जेव्हा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर शुभ-अशुभ असा परिणाम दिसून येतो, अशातच सप्टेंबरमध्ये 2 ग्रह एका राशीत येऊन युती करणार आहेत, हे दोन्ही ग्रह जेव्हा एकत्र येतील तेव्हा राजयोग तयार होणार आहे, सप्टेंबरमध्ये मंगळ आणि बुध एकत्र युती करणार आहेत. यादरम्यान, बुध आणि सूर्याच्या संयोगाने बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. जो 4 राशींसाठी भाग्यवान सिद्ध होईल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आदित्य म्हणजे सूर्य, अशा प्रकारे सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह कुंडलीत एकत्र आल्यावर बुधादित्य योग तयार होतो. कुंडलीत बुध आणि सूर्य एकत्र आल्यास विशेष परिणाम प्राप्त होतात. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे, अशा स्थितीत बुध आणि सूर्य बहुतेक वेळा कुंडलीत एकत्र दिसतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधादित्य योग तयार होतो, तेव्हा त्याला धन, सुख, समृद्धी मिळते. गौरव आणि आदर प्राप्त होतो. चला तर या ग्रहांच्या हालचालींचा बाकीच्या राशींवर काय परिणाम होणार ते पाहूया…
सिंह
बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानला जात आहे. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल, आणि समाजात मान-सन्मान वाढेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम राहील. व्यापार्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे, राजयोगातून चांगली ऑर्डर आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. सूर्य आणि मंगळाच्या संयोगाने अचानक धनप्राप्ती होऊ शकते. व्यापाऱ्यांचे अडकलेले, उधारीचे पैसे परत मिळण्याची चिन्हे आहेत. नवीन कामाची योजना आखल्यास यश मिळू शकते.
मिथुन
मंगळ आणि सूर्याची जोडी मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरू शकते. सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. शुभ योगायोगाने तुम्ही वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करण्याचा योग आहे. तसेच या काळात प्रवासाचे योग आहेत. आईचे सहकार्य मिळेल. दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय मालमत्ता, रिअल इस्टेटशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
मकर
बुधादित्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी चांगला सिद्ध होऊ शकतो. नशीब तुमच्या सोबत असू शकते. करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी आहेत. नोकरी-व्यवसायासाठी काळ चांगला राहील. प्रवासाचे योग आहेत. कुटुंबात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. या काळात तुम्ही वाहने आणि मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे. दुसरीकडे, या काळात तुम्ही केलेले सर्व प्रवास यशस्वी होतील आणि तुम्हाला त्यातून लाभ मिळतील. जर व्यवसाय मालमत्ता, स्थावर मालमत्तेशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल.
धनु
बुधादित्य राजयोग राशीच्या लोकांसाठी भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील. नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरीच्या नवीन संधी उघडतील आणि पदोन्नतीत वाढ होऊ शकते. मंगळ सूर्य देवाचा योगायोग बनणे भाग्यवान सिद्ध होऊ शकते. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो, नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो.