Home Loan : सध्याच्या काळात पगारदार व्यक्तीला कोणतीही मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करायचे असेल तर कर्ज घ्यावे लागते. खरंतर मालमत्ता खरेदी करणे ही एक मोठी आणि दीर्घकालीन गुंतवणूक असून त्यामधील पैसाही इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त असतात. तसेच या खरेदी केलेल्या मालमत्तेमधून मिळणाऱ्या परताव्याची अपेक्षा खूप जास्त आहे, हे बर्याच अंशी सत्य आहे.
परंतु वाढत्या व्याजदरामुळे आता घर घेण्याचा विचार करणाऱ्या लोकांना काळजीत टाकले आहे. कर्जाचा दीर्घ कालावधी आणि महागडे व्याजदर यामुळे लोकांना आर्थिक फटका बसत आहे. अनेकांना गृहकर्ज फिटत नाही. त्यामुळे ते खूप चिंता करतात. जर तुम्हीही या समस्येतून जात असाल तर काळजी करू नका. एक सोपी पद्धत वापरा. तुम्ही कर्जमुक्त व्हाल.

वेळेत गृहकर्ज फेडावे
हे लक्षात घ्या की, गृहकर्जाची वेळेपूर्वी परतफेड करण्यासाठी, तज्ञांचे असे मत आहे की वेळेपूर्वी कर्जाची परतफेड करणे किंवा प्रीपेमेंट करणे हा एक उत्तम पर्याय आहे. समजा तुम्ही गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी वेळेवर ईएमआय भरला नाही तर गृहकर्जाची परतफेड करण्यासोबतच तुम्हाला व्याजही भरावे लागणार आहे. त्याशिवाय जर तुम्ही वेळेपूर्वी कर्जाची परतफेड केली नसेल, तर तुम्हाला ईएमआयसह विलंब शुल्क भरावे लागणार आहे.
तुम्हाला गृहकर्ज लवकर फेडण्यासाठी EMI सह परतफेड प्रक्रियेतून जावून गृहकर्जाची प्रीपेमेंट करता येईल. खरंतर परतफेड प्रक्रियेमध्ये तुम्ही तुमच्या EMI पेक्षा अधिक पैसे भरता. तुम्ही भरलेली अतिरिक्त रक्कम तुमच्या मूळ रकमेपेक्षा कमी असल्याने तुम्ही गृहकर्जाचे कमी व्याज भरता.
जाणून घ्या वेळेत कर्ज भरण्याचे फायदे
गृहकर्जाच्या सुरुवातीला तुम्हाला मुद्दलासह व्याज भरावे लागत आहे. समजा तुम्ही प्रीपेमेंट पर्याय निवडला तर ते तुमची मूळ रक्कम कमी करते. तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागणार आहे. हे लक्षात घ्या की फ्लोटिंग रेट कर्जामध्ये तुम्हाला प्रीपेमेंट शुल्क भरावे लागत नाही तर एफडी रेट लोनमध्ये तुम्हाला प्रीपेमेंट चार्ज भरावा लागेल. त्यामुळे आता अशा परिस्थितीत, तुम्हाला प्रीपेमेंटचा पर्याय लक्षात ठेवावा लागणार आहे.