Shrigonda News : भाजपचे आ. बबनराव पाचपुते करणार उपोषण !

Ahmednagarlive24 office
Published:
Shrigonda News

Shrigonda News : पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अश्या परिस्थितीमध्ये ओव्हरफ्लोच्या पाण्याने धरण भरण्यात यावे. घोड धरणात पाणी सोडण्यास दिरंगाई झाली तर आपण शेतकऱ्यांसह उपोषण करणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला.

या संदर्भात आ. पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कुकडी सल्लागार समितीचे अध्यक्ष ना. चंद्रकांत पाटील यांच्याशी आपण नेहमी संपर्कात आहेत. घोड धरणामध्ये डिंभे धरणाचे ओव्हर फ्लोचे पाणी नदीमध्ये सोडण्यासाठी प्रयत्न चालू आहे.

याबाबत मी केलेल्या पत्र व्यवहारास शासन स्तरावरून सकारात्मक प्रतिसाद आहे. घोड धारणामध्ये तीस टक्के पेक्षा कमी पाणीसाठा असल्याने पाणी सोडण्यास अडचण असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क आणि पत्रव्यवहार केला आहे.

पिण्याचे पाणी सोडावे ही आग्रही मागणी आहे. या बाबत जिल्हाधिकारी यांनी कुकडीच्या अधीक्षक अभियंता यांना पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. विसापूरमध्ये मध्यम साठा अत्यल्प आहे.

कुकडी धरणाच्या ओव्हर फ्लोमधून पाणी सोडावे, यामुळे पिण्याचे व नंतर शेतीचे सिंचन होईल. यामुळे शेतकरी वर्गास मोठा दिलासा मिळेल. ना. चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली. दि ३१ ऑगस्ट रोजी कुकडी सल्लागार समितीची बैठक आहे.

यामध्ये वरील निर्णय होणे अपेक्षित आहे. जर कुकडी ओव्हर फ्लोच्या आवर्तनातुन विसापूर तलावामध्ये अपेक्षित पाणी साठा मंजूर झाला नाही शिवाय घोड धरणात डिंभे मधून पाणी सोडण्यास वेळकाढूपणा झाला तर आपण शेतकऱ्यां समवेत उपोषण करणार आहे. अशी माहिती पाचपुते यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe