Ahmednagar News : बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून दोन गटांत तुंबळ हाणामाऱ्या झाल्याची घटना कोपरगावात घडली आहे. एकमेकावर लाकडी दांडे, लोखंडी गज, दगड, विटाच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला.
या घटनेमध्ये शितल सुनील पगारे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश येसेकर यांनी सांगितले, की ही घटना रविवारी (दि. २७) रात्री १० ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान मावळा चौफुला, आचारी हॉस्पिटल गांधीनगरमध्ये घडली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अंकुश घुले यांनी फिर्याद दिली आहे.
रविवारी गांधीनगरमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून एकमेकांविरुद्ध जाणीवपूर्वक जीवघेणा हल्ला करण्यात आला. जमावाने एकमेकावर लाकडी दांडे, लोखंडी गज, दगड विटाचे तुकड्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमध्ये शितल सुनील पगारे यांना गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याप्रकरणी प्रवीण पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अंकुश घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात एजाज सलिन शेख, साहिल गुलाब शेख, इरफान शकील शेख, ऋतिक कुऱ्हाडे, वैभव मुकेश कुऱ्हाडे, चेतन जाधव, कुणाल भंडारी, पवन रोकडे, गुडी उर्फ विशाल गुलाम वाडेकर,
सलीम लतिफ शेख, किरण शिवलाल लहिरे, फैसल कागद शेख, अनु शाबान पठाण, गुलाब सांडु शेख, नकुल धर्मराज ठाकरे, अजय पाटील, मुऱ्या उर्फ करण गायकवाड व इतर ४ ते ५ अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नकुल धर्मराज ठाकरे, अबू शबान पठाण, किरण शिवलाल अहिरे, सलीम लतीफ शेख, गुलाब सांडू शेख या पाच जणांना अटक केली असून सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश येसेकर हे पुढील तपास करीत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.