Ahmednagar News : अहमदनगरमध्ये बायोडिझेल विक्रीवर कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News :  नगर शहराजवळून जाणाऱ्या महामार्गालगत पुन्हा अवैधरित्या बायोडिझेलची विक्री होत असल्याचा प्रकार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने उघडकीस आणला आहे.

या पथकाने नगर पुणे – महामार्गावरील नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात कारवाई करून बायोडिझेल, विक्री करण्यासाठीचे साहित्य व वाहने असा सुमारे २९ लाख ३४ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४ लाख ७५.४१० रुपये किंमतीचे ६ हजार ९५ लिटर बायोडिझेल मिळून आले आहे.

याप्रकरणी पाच जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमनाथ मुरलीधर बळी (वय ४७ रा. भाजी मार्केटच्या पाठीमागे, सारसनगर), कृष्णा ताराचंद राऊत ( वय २५ रा. झोपडी कॅन्टींग शेजारी, सावेडी), खंडु काकासाहेब गोरडे (वय २३ रा. बालमटाकळी, ता. शेवगाव), देवीदास जाधव व भरत कांडेकर (दोन्ही रा. नगर, पूर्ण नावे माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

जाधव व कांडेकर पसार झाले आहेत. नाशिक परिक्षेत्रातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांनी पथक नियुक्त केले आहे. हे पथक कधीतरी नगर शहरासह जिल्ह्यात कारवाई करण्यासाठी येत असते.

या पथकाने शनिवारी (दि. २६) रात्री साडे दहाच्या सुमारास महामार्गालगत सुरू असलेल्या कामरगाव शिवारातील बंद पडलेले हॉटेल यशच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बायोडिझेल विक्रीवर छापा टाकला.

६ हजार ९५ लिटर बायोडिझेल, विक्री करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व बायोडिझेल भरण्यासाठी आलेली वाहने असा सुमारे २९ लाख ३४ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांना ताब्यात घेतले असून दोघे पसार झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe