Janmashtami 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! ‘या’ तीन राशींसाठी खूप खास असेल यावेळची जन्माष्टमी…

Content Team
Published:
Janmashtami 2023

Janmashtami 2023 : रक्षाबंधनानंतर, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे, हिंदूंचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण यांचा हा वाढदिवस आहे, जो प्रत्येकाला आपापल्या शैलीत साजरा करायला आवडतो. यावेळी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी 6 सप्टेंबर रोजी येत आहे.

अष्टमी तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 27 सप्टेंबर रोजी दुपारी 4:14 वाजता संपेल. यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीला ग्रह-नक्षत्रांचा विशेष संयोग होत आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्र तयार होत आहे, या नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला. याशिवाय सवर्थ सिद्धी आणि रवियोगही घडत आहेत. आणि चंद्र वृषभ राशीत विराजमान राहील.

ज्योतिषशास्त्रानुसार, असा अद्भुत योगायोग सुमारे 30 वर्षांनंतर घडत आहे. ज्यामुळे उपवासाचे महत्त्व वाढत आहे. याचा सर्व राशींवर परिणाम होईल, परंतु काही राशींना श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी-

कर्क

कर्क राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाच्या विशेष आशीर्वादांचा वर्षाव होईल. अष्टमीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यास तुम्हाला लाभ होईल, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. मृत्यूनंतर मोक्षप्राप्तीचे आशीर्वाद मिळेल. या दिवशी राधारानी आणि श्रीकृष्णाची एकत्र पूजा करा, चांगले संकेत मिळतील.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी यंदाची जन्माष्टमी खूप शुभ मानली जात आहे. या काळात प्रगतीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बालगोपालांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या सर्व कार्यात यश मिळेल. तसेच कुटुंबातील सुख-समृद्धी वाढेल. तसेच आर्थिक अडचणी संपतील, आणि नवीन मार्ग खुले होतील.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या विशेष आशीर्वादांचा वर्षाव होईल. परिश्रमाने केलेल्या सर्व कामांमध्ये यश मिळेल. अष्टमीच्या दिवशी मनोभावे राधारानी आणि श्रीकृष्णाची पूजा करा सर्व कामात यश मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe