Nanded Successful Farmer : यंदा संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यातील काही भागात यापूर्वी देखील दुष्काळ पडत राहिला आहे. मात्र यंदा ज्या भागात कधी दुष्काळ आठवतही नव्हता त्या भागातही दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.
खरंतर मराठवाड्याला याआधी देखील दुष्काळाची झळ बसलेली आहे. तीन वर्षांपूर्वी मराठवाड्यात कायमच दुष्काळी परिस्थिती राहत होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात चांगला पाऊस झाला आहे. यंदा मात्र पुन्हा एकदा मराठवाड्याला दुष्काळाची झळ बसणार असे सांगितले जात आहे.
दरम्यान या दुष्काळी मराठवाड्यातून एक शेती मधलं कौतुकास्पद असं उदाहरण समोर आल आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाने चक्क माळरानावर ड्रॅगन फ्रुट लागवड यशस्वी करून दाखवली आहे. शिक्षकी पेशा सांभाळत नांदेडच्या या अवलियाने शेतीमध्ये साधलेली ही किमया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील शेतकरी ज्ञानोबा गंगाधर मजरे यांनी ही किमया साधली आहे. ज्ञानोबा यांच्याकडे वडीलोपार्जित सात एकर जमीन आहे. या जमिनीत ते पारंपारिक शेती करतात. यासोबतच त्यांनी गेल्या वर्षी सात एकर पैकी एक एकर जमिनीवर जून महिन्यात ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ड्रॅगन फ्रुट ची लागवड करण्यात आली. दरम्यान यावर्षी या ड्रॅगन फ्रुटला फळधारणा झाली आहे. खरंतर ज्ञानोबा हे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील कोठारी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र लहानपणापासून शेतीची आवड असल्याने त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळत शेती देखील सुरू ठेवली आहे.
आता त्यांनी आपल्या शेतीत ड्रॅगन फ्रुट ची यशस्वी लागवड करून दाखवली आहे. ज्ञानोबा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी रॉयल रेड आणि जम्बो रेड या दोन व्हरायट्या लावल्या आहेत. यापैकी रॉयल रेड या वरायटीचे ड्रॅगन फ्रुट आकाराने लहान असते मात्र फळ खूप गोड असते. तर जम्बो रेड या व्हरायटीचे ड्रॅगन फ्रुट आकाराने मोठे असते. पण या दोन्ही जातीच्या ड्रॅगन फ्रुटला बाजारात मोठी मागणी आहे. ज्ञानोबा यांनी अकरा बाय सहा फूट