How To Lose Belly Fat : वाढलेलं पोट कमी करायचंय ? ह्या चार गोष्टी आजपासून फॉलो करा एक महिन्यात फरक दिसेल

Ahmednagarlive24 office
Published:
How To Lose Belly Fat

How To Lose Belly Fat : जी माणसं सामान्यत: सिटिंग जॉब म्हणजेच बसून काम करतात, अशा माणसांचा लठ्ठपणा वेगाने वाढतो. कारण ८ ते १० तासांपर्यंत एक सारख्या समस्येत राहून कंबर आणि पोटाजवळ चरबी वाढण्यास मदत मिळते.

लठ्ठपणा सर्वात मोठी समस्या आहे. त्यातून अनेक लोक असे देखील आहेत ज्याचं वजन नियंत्रित असलं तरी पोट काही कमी होत नाही. अशात केवळ दोन आठवड्यांत दोन ते तीन किलो वजन कमी करणे काही कठीण जाणार नाही. तर जाणून घ्या वाढत असलेल्या पोटाला कसे नियंत्रित करता येईल.

भारतात तेळकट पदार्थ खाण्याची लाईफस्टाईल जास्त आहे. या कारणामुळे आपल्या शरीरात खूप जास्त चरबी जमा होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असते. जी माणसं बसून काम करतात, त्यांची कॅलरी बर्न होत नाही आणि तिचं रुपांतर फॅटमध्ये होतं

१) सकाळी कोमट पाणी प्या सकाळी उठून पाणी पिणे

आरोग्यासाठी चांगलं असतं. अशात लठ्ठपणा घालवण्यासाठी सकाळी उठून कोमट पाणी पिणे योग्य ठरेल. सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात एका लिंबाचा रस मिसळून प्यावं. याने शरीरात आढळणारे टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होईल.

२) पायी चालणे किंवा व्यायाम करणे

दररोज ३० मिनिटे पायी चालणे किंवा व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. याने आपण मधुमेह, हार्ट अॅटॅक, स्ट्रोक आणि हायब्लडप्रेशरसारख्या गंभीर आजारापासून दूर राहू शकतो. पोटावर बळ पडणारे व्यायाम बेली कमी करण्यास फायदेशीर ठरतील.

३) सकाळचा नाश्ता टाळू नका

नेहमी सकाळी नाश्ता केला पाहिजे. नाश्त्यात आवश्यक पोषकतत्त्व सामील असावीत. ही पोषक तत्त्वे आमच्या दिवसभराच्या कार्यासाठी ऊर्जा प्रदान करतात. म्हणून सकाळी व्यायाम केल्यानंतर ब्रेकफास्ट नक्की करावा. आपण नाश्त्यात ओट्स, होल ग्रेन ब्रेड, अंडी, आमलेट, पोहा, थालीपीठ, रव्याचा उत्तपा, फळं आदी सामील करू शकता. हे सर्व पदार्थ आपल्यासाठी फायदेशीर ठरतील.

४) आहाराकडे लक्ष द्या

दिवसभर भूक लागल्यावर अनेकदा चुकीचे पदार्थ खाल्ले जातात, ज्यामुळे वजन वाढू लागते. आपल्याला दुसऱ्यांदा भूक लागल्यावर तेलकट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे आपलं वजन आणखी वाढू शकतं. अशावेळी मखाना, शेंगदाणे सेवन करावेत. याव्यतिरिक्त आपण नट्स, ओट्स, चणे, सॅलड खाऊ शकता.

ह्या गोष्टी चुकूनही करू नका

भाजी करताना तेल कमी टाकावं.

मैद्याचं काहीच खाऊ नये.

आहारात साखर पूर्णपणे टाळावी. आठवड्याभरात फरक दिसून येईल.

भात खाऊ नये.

शरीरात जास्त कर्बोदके नसावीत त्यामुळे वजन वाढतं.

जेवायची ठराविक वेळ ठरवावी.

कोल्ड ड्रिंक किंवा कुठल्याही प्रकारचं ड्रिंक घेऊ नये.

तळलेलं काहीच खाऊ नये.

आठ तासापेक्षा कमी झोपू नये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe