अहमदनगर ब्रेकिंग : अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

Published on -

Ahmadnagar Breaking : शहरात महापालिका व पोलिसांनी विशेष मोहीम राबवत अनधिकृत धार्मिक स्थळांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली. काटवन खंडोबा रस्त्यावरील मनपाच्या संजयनगर घरकुल संकुल परिसरातील खुल्या जागेत ही बांधकामे करण्यात आली होती.

जेसीबीद्वारे या बांधकामांसह अतिक्रमण असलेली अन्य अनधिकृत शेडही काढून टाकण्यात आले. मनपाची ही कारवाई पाहण्यास तेथे मोठी गर्दी झाली होती.

काटवन खंडोबा मंदिराजवळ असलेल्या मनपाच्या संजयनगर घरकुल योजनेच्या मोकळ्या जागांमध्ये धार्मिक स्थळांचे तसेच अन्य शेडचे अतिक्रमण होते. या अतिक्रमणांचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत होता.

धार्मिक स्थळांमुळे अतिक्रमणांचा मुद्दा संवेदनशील असल्याने या पार्श्वभूमीवर मनपा व कोतवाली पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) पहाटे पाचच्या सुमारास फौजफाट्यासह धाव घेतली व सकाळी सव्वा सहाच्या सुमारास कारवाई सुरू केली. सुमारे दोन तासांच्या या कारवाईत अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

दरम्यान, या परिसरातील अतिक्रमणाबाबत सात महिन्यापूर्वी तक्रार करण्यात आली. या तक्रारीची चौकशी सुरू झाल्यावर मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पाहणीही केली. पण प्रत्यक्ष कारवाईला झाली नव्हती.

त्यामुळे १५ दिवसांपूर्वी पुन्हा मनपाकडे रहिवाशांनी तक्रारी केल्यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशाने अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपाच्या पथकाने दोन-तीन दिवसांपासून या परिसरात येऊन तेथील रहिवाशांना येथील अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News