Ajab Gajab News : एक कुटुंब असे ही… चक्क माकडांसारखे दोन हात आणि दोनपायांवर चालतात

Published on -

सध्याचा प्रगत मानव हा उत्क्रांतीचे अनेक टप्पे पार करून आला आहे. तुम्ही-आम्ही आता ताठ कण्याने दोन पायांवर चालतो. पण हजारो वर्षांपूर्वी आपले पूर्वज माकडांसारखे दोन पाय आणि दोन हात टेकवून चालत होते, हे आपल्याला माहीत आहे.

परंतु सध्याच्या काळातही एक कुटुंब असे आहे की ज्या कुटुंबातील काही सदस्य आजदेखील माकडांसारखे चालतात. हे लोक आपले दोन हात आणि दोन पाय जमिनीवर टेकवून चालतात. तुर्कीमध्ये हे अनोखे कुटुंब आहे, त्या घराण्याचे नाव आहे उलास फॅमिली’

माणूस असूनही हे लोक माकडांसारखे का चालतात हे शास्त्रज्ञांनाही न उलगडलेले कोडे आहे. या अनोख्या कुटुंबावर आधारित ‘द फॅमिली दॅट बॉक्स ऑन ऑल फोर्स’ नावाची एक डॉक्युमेंटरी काही वर्षांपूर्वी बीबीसी या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली होती.

ही डॉक्युमेंटरी रिलीज होण्याच्या आधीदेखील या कुटुंबाबद्दल काही शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍्सचे प्रोफेसर निकोलस हम्फ्रे यांनी या कुटुंबाचा बारकाईने अभ्यास केला.

त्यांना आढळले की, या कुटुंबातील १८ मुलांपैकी ६ मुलांमध्ये असामान्य गुण आहेत. या सहापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. निकोलस हम्फ्रे यांनी आपल्या *सिक्स्टी मिनिट्स ऑस्ट्रेलिया’ नामक डॉक्युमेंटरीमध्ये म्हटले आहे की, सध्याचा प्रगत मानव पुन्हा एकदा आपल्या भूतकाळाकडे वळू लागला आहे की काय, असे आपल्याला या लोकांना पाहून वाटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!