Business Idea : अनेकांचा केवळ नोकरीवरच उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे ते नोकरीसोबतच व्यवसाय सुरु करतात. आता तुम्हालाही नोकरी करत करत स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही घरी बसून कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरु करू शकता.
इतकेच नाही तर जर तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्हाला सरकारी मदत मिळेल. ज्यातून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. विशेष म्हणजे या व्यवसायांना बाजारात खूप मागणी आहे.

हे व्यवसाय आता तुम्ही फक्त काही रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु करू शकता. ज्यावेळी तुमची कमाई वाढत जाते त्यावेळी तुम्ही भांडवल वाढवून तुमच्या व्यवसायात वाढ करू शकता. सध्या मार्केटमध्ये असाच एक व्यवसाय आहे जो तुम्ही फक्त 50,000 रुपयांच्या बजेटमध्ये चालू करू शकता.
अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय
आता तुम्ही घरबसल्या अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हे लक्षात घ्या की अगरबत्ती बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या यंत्राची गरज पडते. यात ड्रायर मशीन, मिक्सर मशीन आणि मुख्य उत्पादन मशीनचा समावेश असेल.
देशात अगरबत्ती बनवण्याच्या मशीनची किंमत 35000 ते 175000 रुपयांपर्यंत असून तुम्ही या मशीनच्या मदतीने 1 मिनिटात 150 ते 200 अगरबत्ती बनवू शकता. समजा तुम्ही हाताने अगरबत्ती बनवली तर तुम्हाला 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीपासून सुरुवात करता येईल.
या गोष्टींची असेल गरज
आता तुम्हाला अगरबत्ती तयार करण्यासाठी डिंक पावडर, कोळशाची पावडर, फुलांच्या पाकळ्या, सुगंधी तेल, बांबू, नार्सिसस पावडर, पाणी, सुगंध, चंदन, जिलेटिन पेपर आणि पॅकिंग साहित्याची गरज आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी तुम्ही बाजारातील चांगल्या पुरवठादारांशी संपर्क करा.
लोणचे बनवण्याचा व्यवसाय
तुम्हाला घरच्या घरी लोणचे बनवण्याचा व्यवसाय चालू करता येईल. यात सुरुवातीला अवघ्या 10,000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. तुम्ही प्रत्येक महिन्याला कमीत कमी 30,000-3,500 रुपये आणि वार्षिक लाखो रुपयांची कमाई करू शकता. तुम्ही लोणचे ऑनलाइन, घाऊक, किरकोळ बाजारात विकू शकता.
टिफिन सेवा व्यवसाय
हा देखील व्यवसाय तुम्ही घरी बसून सुरु करू शकता. सुरुवातीला तुम्ही हा व्यवसाय 8000 ते 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु करू शकता. जर लोकांना तुमचे जेवण आवडत असेल तर तुम्ही दर महिन्याला 1 ते 2 लाख रुपयांची सहज कमाई करू शकता. अलीकडच्या अनेक स्त्रिया हा व्यवसाय करून चांगली कमाई करत आहेत.
मिळेल सरकारी मदत
केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, आता तुम्ही त्याचा फायदा घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे 900 चौरस फूट क्षेत्रफळ असावे. हे लक्षात घ्या की लोणची तयार करणे, लोणचे सुकवणे, लोणचे पॅकिंगसाठी मोकळी जागा लागते. तुम्ही तयार केलेले लोणचे जास्त काळ खराब होणार नाही याची खात्री करावी.