Ahmednagar City News : अचानकपणे सुरु झालेले भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar City News : केडगाव परिसरात तसेच नगर-दौड रोडवरील हनुमाननगर, इंदिरानगर, विद्यानगर, शितल हॉटेल मागील परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अचानक संध्याकाळच्या वेळेस भारनियमन सुरु करण्यात आलेले आहे.

केडगाव हे महानगरपालिकेच्या हद्दीत असून विद्युत विभागाच्या अर्बन क्षेत्रात येत असून यात भारनियमन करता येत नाही तरी सुद्धा केडगाव परिसरात अचानकपणे सुरु झालेले भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा नगरसेवक मनोज कोतकर यांनी विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंता सौ. नगराळे यांना दिला आहे.

श्री. कोतकर म्हणाले की, केडगाव परिसरात सुरु असलेल्या भारनियमनामुळे रात्रीच्या वेळेस अंधार पसरत असल्यामुळे रस्त्यावर लहान मोठे अपघात सतत घडत आहेत, वाहन चालकांना वाहने चालविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, याचबरोबर या परिसरामध्ये संध्याकाळी लाईट नसल्याने अंधाराचे फायदा चोरटे घेत आहे,

या भागात भुरट्या चो-यांचे प्रमाण सुध्दा वाढलेले आहे. संध्याकाळी तात्काळ भारनियमन सुरु केलेले असल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांना व स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचण निर्माण होत आहे.

सध्या सणासुदीचे, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे दिवस सुरु असून अशा स्थितीत भारनियमन केले जात आहे यामुळे महिला, विद्यार्थी, नागरिक संताप व्यक्त करत आहे, तरी हे भारनियमन तात्काळ बंद करावे

अन्यथा आपल्याला कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता या परिसरातील नागरिकांच्या समवेत आपल्या दालनात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल व होणाऱ्या संभाव्य परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील असा इशारा नगरसेवक मनोज कोतकर यांनी वीज वितरण कंपनीला निवेदनातून दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe