विद्यार्थ्यांना टवाळखोरांकडून मारहाण

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या पवन आव्हाड, आसिफ पठाण यांच्यात किरकोळ वाद झाला, किशोर बुधवंत व विशाल कारखेले यांनी भांडण मिटवले, त्यानंतर तिसगाव येथील काही टवाळखोर तरुणांनी एकत्रित येत एका मिठाईच्या दुकानात घुसून किशोर बुधवंत व विशाल कारखेले, या दोघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या मारहाणीच्या घटनेनंतर शिरापूर, त्रिभुवनवाडी येथील ग्रामस्थांनी शनिवारी तिसगावमध्ये येऊन या तरुणांचा शोध घेऊन त्यांना जशास तसे उत्तर देण्याच्या प्रयत्न जात असतानाच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकात येऊन वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टाळला.

तिसगाव मधील ज्या तरुणांनी दोन शालेय विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांच्याविरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, किशोर सोपान बुधवंत रा. शिरापूर, या विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरमान पठाण, सोहेल लालखाँ पठाण, आतिक पठाण,

मोसीन शेख, आझाद पठाण, तोहेब असीफ सय्यद, सर्व रा. तिसगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, २४ तासांत या सर्व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी दिल्यानंतर तिसगावमधील वातावरण शांत झाले.

या वेळी युवानेते भाऊसाहेब लवांडे पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, सरपंच नितीन लोमटे, काका पाटील लवांडे, अखिल लवांडे, ग्रामपंचायत सदस्य पंकज मगर आदींनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

शाळा परिसरात सातत्याने काही टवळखोर तरुणांकडून बाहेरगावच्या तरुणांना, विद्यार्थ्यांना दमबाजी व मारहाण केली जात आहे, अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी शाळा प्रशासनानेदेखील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी युवानेते भाऊसाहेब लवांडे पाटील यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe