मजुरांची दैना संपेना;पुन्हा अपघात, ५ ठार तर ११ गंभीर

Ahmednagarlive24
Published:

लॉक डाऊनमुळे अडकलेल्या व त्यामुळे गावी निघालेल्या मजुरांची दैना काही केल्या संप्याचे नाव घेत नाही.

रेल्वे मार्गावर १६ कामगारांच्या मृत्यूची घटना ताजी असताना शनिवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधील पाथा गावाजवळ आंब्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला.

या एका घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे तर ११ जण गंभीर जखमी झाले आहे. या ट्रकमध्ये १८ मजूर होते. हा ट्रक हैदराबादवरून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे जात होता.

दरम्यान, पाथाजवळ ट्रक उलटला. नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी दीपक सक्सेना यांनी या घटनेबद्दल माहिती दिली.

तेलंगानातील हैदराबाद येथून आग्रा येथे जाणाऱ्या या ट्रकमध्ये १८ मजूरही आग्रा येथे जात होते, असं त्यांनी सांगितलं.

लॉकडाउनमुळे प्रवासाच्या सुविधा बंद आहेत. विशेषतः राज्यांबरोबरच जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आलेल्या आहेत.

त्यामुळे अनेक मजूर पायीच घरी जात आहेत. अशाच प्रकारे घरी जात असताना जालना-औरंगाबाद दरम्यान रेल्वे मार्गावर १६ जणांना रेल्वेनं चिरडलं होतं.

या घटनेला दोन दिवस होत नाही, तोच आणखी एका अपघातात ५ मजूरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe