Ahmednagar Crime : नेवासा तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत 28 वर्षीय विवाहित महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की,
माझे पती, सासु-सासरे व मुला-बाळासह एकत्र राहते व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. दरम्यान, (दि. 2) रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास भिमराज भिकाजी कनगरे हा माझ्याजवळ आला व मला म्हणाला की, तु मला खुप आवडतेस, असे बोलून त्याने मला मिठी मारली व मला लज्जा उत्पन्न होईल,
असे कृत्य केले व मला म्हणाला की, तु जर झालेले प्रकार कोणाला सांगितला, तर मी तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणुन त्याने मला शिवीगाळ केली आहे. या फिर्यादिवरुन भिमराज भिकाजी कनगरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.