Numerology : खूप जिद्दी स्वभावाचे असतात ‘हे’ लोक; ‘या’ उपायांनी चमकेल नशीब !

Sonali Shelar
Updated:
Numerology

Numerology : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येतो. तसेच त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बऱ्याच गोष्टी कळतात. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, किंवा जीवनातील चढ-उतार तसेच भविष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेता येतात. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकाच्या आधारे व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.

कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेचा मूलांक क्रमांक शोधणे खूप सोपे आहे, त्यासाठी फक्त तारखेचे अंक जोडावे लागतील. उदाहरणार्थ, 4 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक फक्त 4 असेल, त्याचप्रमाणे, 0 ते 9 पर्यंतची मूलांक संख्या वेगवेगळ्या संख्यांच्या बेरीजच्या आधारे काढली जाते.

जन्मतारीख आणि नक्षत्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि वागणूक भिन्न असते आणि अंकशास्त्र आपल्याला त्याबद्दल माहिती देते. व्यक्ती इतरांशी कसे वागेल, त्याचा स्वभाव कसा असेल, भविष्यात तो कोणता करिअरचा मार्ग निवडेल आणि त्याला किती यश मिळेल. या सर्व गोष्टी फक्त एका छोट्या संख्येतून शोधल्या जाऊ शकतात. आज आम्‍ही तुम्‍हाला नंबर 2 राशीच्‍या लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा जन्म महिन्याच्‍या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे.

मूलांक 2 चे लोक कसे असतात?

-मूलांक दोनचा संबंध हा चंद्राशी असतो. यामुळेच ते चंद्रासारखे शीतल आणि कोमल मनाचे आहेत.

-हे व्यक्ती सुंदर असण्यासोबतच खूप आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात, तसेच हे व्यक्ती आपल्या सुंदरतेने सर्वांना वेड लावतात. आज आपण

-हे व्यक्ती त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे कधीकधी घाईघाईने निर्णय घेतात, जे त्यांना नंतर महागात पडतात.

-हे थोडे हट्टी स्वभावाचे असतात तसेच त्यांना त्यांच्या गोष्टी सर्वत्र करून घ्यायच्या असतात, ज्या त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आवडत नाहीत.

-ते आपले मत सर्वांसमोर मांडतात परंतु इतरांचे ऐकत नाहीत, ज्यामुळे अनेकदा समस्या निर्माण होतात.

सुखी जीवनासाठी ‘हे’ करा उपाय

-मूलांक 2 असणाऱ्या व्यक्तींसाठी सोमवार हा खूप शुभ मानला जातो आणि भगवान शिवाची उपासना करणे त्यांच्यासाठी फलदायी असते.

-या व्यक्तींना आपल्या जीवनात सुख-समृद्धी मिळवायची असेल तर पौर्णिमा आणि प्रदोषाचे व्रत करावे.

-पांढरा आणि केशरी रंग त्यांच्यासाठी शुभ आहेत, तसेच निळा आणि काळा रंग घालणे टाळावे.

-त्यांनी चांदीचा ग्लास वापरावा, यामुळे त्यांचा चंद्र बलवान होईल आणि त्यांची रात्रंदिवस दुप्पट प्रगती होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe