पुणे: लॉक डाऊनमुळे अडकलेले इतर राज्यांतील मजूर रस्त्याने चालले तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो म्हणून रेल्वे मार्गाने चालत जाण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत.
या प्रवाशांना अटकाव करून, दुर्घटना टाळण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) पावले उचलली आहेत. जवानांची गस्त आणि रेल्वे मार्गावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे मार्गाचे ट्रॅकिंग केले जात आहे.
पुणे लॉक डाऊनमुळे अडकलेले इतर राज्यांतील मजूर रस्त्याने चालले तर पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो म्हणून रेल्वे मार्गाने चालत जाण्याचा पर्याय निवडतात.
त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रवाशांना अटकाव करून, दुर्घटना टाळण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) पावले उचलली आहेत.
जवानांची गस्त आणि रेल्वे मार्गावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे मार्गाचे ट्रॅकिंग केले जात आहे. पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा झोन करण्यात आले असून लोणावळा ते देहू रोड, देहू रोड ते खडकी, खडकी ते पुणे स्टेशन, पुणे स्टेशन ते सासवड,
सासवड ते निरा आणि लोणी काळभोर या विभागांचा समावेश आहे. जालन्याहून औरंगाबादला जाण्यासाठी करमाड-सटाणा रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या १६ मजुरांचा मालगाडीखाली चिरडून अंत झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
या पार्श्वभूमीवर ही पावले उचलली आहेत. या प्रत्येक विभागात लोहमार्ग पोलिस गस्त घालून रेल्वे मार्गाचे ट्रॅकिंग करणार आहेत, अशी माहिती पुणे लोहमार्ग पोलिस रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली; तरीही मालगाड्या धावतच आहेत.
त्यामुळे मार्गांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी विविध तांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जाणार आहे; तसेच त्या कर्मचाऱ्यांनाही ‘अपडेट’ देण्यास सांगितले आहे, अशी माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.
लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा झोन करण्यात आले असून लोणावळा ते देहू रोड, देहू रोड ते खडकी, खडकी ते पुणे स्टेशन, पुणे स्टेशन ते सासवड, सासवड ते निरा आणि लोणी काळभोर या विभागांचा समावेश आहे.
जालन्याहून औरंगाबादला जाण्यासाठी करमाड-सटाणा रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या १६ मजुरांचा मालगाडीखाली चिरडून अंत झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या पार्श्वभूमीवर ही पावले उचलली आहेत.
या प्रत्येक विभागात लोहमार्ग पोलिस गस्त घालून रेल्वे मार्गाचे ट्रॅकिंग करणार आहेत, अशी माहिती पुणे लोहमार्ग पोलिस रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली; तरीही मालगाड्या धावतच आहेत.
त्यामुळे मार्गांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी विविध तांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जाणार आहे; तसेच त्या कर्मचाऱ्यांनाही ‘अपडेट’ देण्यास सांगितले आहे, अशी माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.