Health Tips : काही जणांना जास्त मीठ खाणे आवडते. जेवणातही वरून पुन्हा मीठ घेण्याची अनेकांची सवय असते. मात्र सावधान, हे जास्तीचे मीठ तुमच्या जीवाशी खेळ ठरू शकतो. कारण ते शरीरात सोडियमचे प्रमाण वाढवते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. सोडियमने थकवा येऊ शकतो. आपल्या शरीरात मीठ जास्त आहे, हे आपण कसे ओळखावे?
जेव्हा आपण काही खारट खातो तेव्हा आपल्याला तहान जास्त लागते. जर आपल्याला सातत्याने तहान लागत असेल तर समजा की, तुमच्या शरीरात मीठाचे प्रमाण जास्त आहे.
दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे जेव्हा आपल्या शरीरात मीठ जास्त होते तेव्हा सारखी लघवी येते. त्यामुळे रात्री अनेक वेळा टॉयलेटला जाण्यासाठी जाग येते. झोपण्यापूर्वी मिठाचे सेवन मर्यादित करायला हवे म्हणजे डिहायड्रेशनही होणार नाही.
वारंवार लघवीला जावे लागणार नाही. शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते आणि मग मेंदूतील रक्तवाहिन्या एक्सपांड होतात, पसरतात, विस्तारतात. यामुळेच डोकेदुखीची समस्या उद्भवते.. त्यामुळे शरीरात मिठाचे प्रमाण संतुलितच असायला हवे.
जेव्हा आपल्या शरीरात मीठ जास्त होते तेव्हा लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाते. मीठ जास्त खातात त्यांना एकाग्रता करण्यात अडचण येते. असे लोक मन शांत करून लक्ष केंद्रित करूच शकत नाहीत.
सोडियम जास्त झाल्यास आपली त्वचा कोरडी होते. मीठ कमी खाल्ल्यास आपली त्वचा टवटवीत दिसते. परंतु हेच प्रमाण जर जास्त असेल तर त्वचा कोरडी दिसते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मिठाचे सेवन प्रमाणात करा. जेवणात नेहमीच मीठ चवीपुरतेच असायला हवे. किंबहुना ते फार नसले तरीही चालेल. त्याचे प्रमाण कालांतराने विविध आजारांनाही आमंत्रण देत राहते.