Realme C30s : सर्वात भारी ऑफर! 8 हजारांपेक्षा स्वस्तात घरी आणा ‘हा’ भन्नाट फोन, पहा ऑफर

Published on -

Realme C30s : जर तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्हाला शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता तुम्ही 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वात विकला जाणारा फोन खरेदी करू शकता.

तुम्ही कमी किमतीत Realme C30s हा स्मार्टफोन खरेदी करू शकता, अशी ऑफर कंपनीच्या वेबसाइटवर मिळत आहे. या फोनची मूळ किंमत 8,499 रुपये इतकी आहे. परंतु तो तुम्ही 7,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनवर 500 रुपयांपर्यंतचे कॉईन बेनिफिट्स मिळत आहेत. जर तुम्ही फोन खरेदीसाठी MobiKwik वॉलेट वापरले तर, तुम्हाला 500 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.

जाणून घ्या Realme C30s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीकडून आपल्या या शानदार स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात येत आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येत आहे. स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी अंतर्गत स्टोरेज दिले आहे. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने त्याची मेमरी 1 टीबी पर्यंत वाढवू शकता.

कंपनीचा हा शानदार फोन पॉवरफुल ऑक्टा-कोअर प्रोसेसरवर काम करत आहे. वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह 8-मेगापिक्सलचा AI कॅमेरा पाहायला मिळेल. या कॅमेऱ्याने तुम्हाला 1080P आणि 30fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करता येतील.

तर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा AI कॅमेरा दिला आहे. Realme C30s या फोनला उर्जा देण्यासाठी, फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 10 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. याच्या OS बद्दल सांगायचे झाले तर, हा फोन Android 12 वर आधारित Realme UI Go Edition वर काम करतो.

कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, 3.5 मिमी हेडफोन जॅक, मायक्रो यूएसबी पोर्ट आणि 3-कार्ड स्लॉट सारखे पर्याय देण्यात आले करेल. तुम्ही Realme चा हा फोन स्ट्राइप ब्लू आणि स्ट्राइप ब्लॅक कलर पर्यायांमध्ये सहज खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News