Ahmednagar News : टाकळी ढोकेश्वर पारनेर तालुक्याच्या विकासात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. तसेच खा. सुजय विखे पा. यांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन जि. प. बांधकाम समितीचे मा. सभापती काशिनाथ दाते सर यांनी केले.
खा. सुजय विखे पा. यांच्या प्रयत्नांतून व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून टाकळी ढोकेश्वर ते खामकर झाप ते वडगाव सावताळ, या ७.४५ कोटी खर्चाच्या ८ किमी रस्ता कामाचे उद्घाटन मा. सभापती काशिनाथ दाते,
भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोहोकले, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील थोरात, वसंतराव चेडे, युवानेते राहुल शिंदे, सचिन वराळ, सुभाष दुधाडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
श्री. दाते पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासाठी अनेक कामे करता आली, याचे समाधान आहे; परंतु जिल्हा परिषदेत काम करताना रस्त्याच्या कामासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध होत नाही.
मात्र, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत पारनेर तालुक्यातील प्रलंबित रस्ता कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने ही कामे मार्गी लागत आहेत, त्यासाठी विखे परिवाराचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
या वेळी विश्वनाथ कोरडे यांनी, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक तसेच जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करत संपूर्ण राज्यासह पारनेर तालुक्यातही विकासकामांसाठी सरकारने मोठा निधी दिला असल्याचे सांगितले. या वेळी युवानेते राहुल शिंदे व टाकळी ढोकेश्वर सोसायटीचे मा. चेअरमन बबनराव पायमोडे सर यांची भाषणे झाली.