FD Rates : जास्तीत जास्त ग्राहकांना एफडी गुंतवणूकडे आकर्षित करण्यासाठी बँका मुदत ठेवींवरील व्याज वाढवताना दिसतात, देशातील बऱ्याच छोट्या-मोठ्या बँकांनी आपल्या एफडी दारात वाढ करून ग्राहकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे, अशातच जर तुम्ही देखील एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी जास्त परतावा देणाऱ्या बँकांची यादी घेऊन आलो आहोत.
आज आम्ही येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कॅनरा बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा (BOB), Axis बँक, HDFC बँक आणि पोस्ट ऑफिसच्या FD वर उपलब्ध व्याजदरांबद्दल माहिती दिली आहे. लक्षात घ्या खाली दिलेले दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ FD वर उपलब्ध आहेत. चला या बँका 5 वर्षांच्या एफडीवर किती व्याज देत जाणून घेऊ…
-SBI – 5 वर्षांच्या FD वरील व्याजदर
SBI 15 फेब्रुवारी 2023 पासून सर्वसामान्यांना 5 वर्षाच्या FD वर 6.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याज देत आहे. येथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. जर तुम्ही सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
-कॅनरा बँक – 5 वर्षांच्या FD वरील व्याजदर
कॅनरा बँक 8 ऑगस्ट 2023 पासून सर्वसामान्यांना 5 वर्षांच्या ठेवींवर 6.7% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.2% व्याज देत आहे. तुम्ही येथे गुंतवणूक करून देखील चांगली कमाई करू शकता.
-ICICI बँक – 5 वर्षांच्या FD वरील व्याजदर
ICICI बँक 24 फेब्रुवारी 2023 पासून सर्वसामान्यांना 5 वर्षांच्या ठेवींवर 7% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याजदर देत आहे.
-बँक ऑफ बडोदा (BOB) – 5 वर्षांच्या FD वरील व्याजदर
बँक ऑफ बडोदा 12 मे 2023 पासून सर्वसामान्यांना 5 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 6.5% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.15% व्याजदर देत आहे.
-अॅक्सिस बँक – 5 वर्षांच्या FD वरील व्याजदर
Axis Bank 8 ऑगस्ट 2023 पासून सर्वसामान्यांना 5 वर्षांच्या ठेवींवर 7% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर देत आहे.
-HDFC बँक – 5 वर्षांच्या FD वरील व्याजदर
HDFC बँक 15 फेब्रुवारी 2023 पासून सर्वसामान्यांना 5 वर्षांच्या ठेवींवर 7% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.5% व्याजदर देत आहे.
-पोस्ट ऑफिस – 5 वर्षांच्या FD वरील व्याजदर
पोस्ट ऑफिस 1 जुलै 2023 ते 9 सप्टेंबर 2023 या कालावधीत सर्वसामान्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षांच्या ठेवींवर 7.5% व्याजदर देत आहे.