जनतेचे प्रश्न व अडचणी सोडवून घेण्यासाठी गाव चलो, घर चलो अभियान : ॲड. प्रताप ढाकणे

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करत राहण्याचे आपले ध्येय असून, कुठलीही निवडणूक नसताना जनतेचे प्रश्न व अडचणी सोडवून घेण्यासाठी आपण गाव चलो, घर चलो अभियान सुरु केले आहे,

लोकांशी चर्चा केल्यानंतर प्राथमिक सुविधांपासून अद्याप नागरिक वंचित असल्याचे ठिकठिकाणी जाणवत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप काका ढाकणे यांनी केले.

शेवगाव शहरात विविध भागांमध्ये घर चलो, गाव चलो अभियानांतर्गत श्री. ढाकणे यांनी व्यापारी आडते, बाजारपेठ, माळी गल्ली, खंडोबानगर, रेव्हेन्यू कॉलनी वस्ती, लांडे वस्ती, पवार वस्ती, इंसानियत ग्रुप, शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम, विचार मंच, जुना प्रेस परिसर आदी भागात गाठी भेटी घेतल्या,

या वेळी वसंतराव लांडे गुरुजी यांच्या वस्तीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी दिलीपराव लांडे, कृष्णानाथ पवार, वंसतराव लांडे गुरुजी, सतीश लांडे, एजाज काझी, प्रताप फडके, शिवशंकर राजळे, राहुल मगरे, वजीर पठाण, जयेश भोकरे, बाळासाहेब डाके, मनीष बाहेती,

कानिफ कर्डिले, भाऊसाहेब कोल्हे, अशोकराव शिंदे सर, रामभाऊ साळवे, बाळासाहेब खटोड, ज्ञानेश्वर लोखंडे, बापूसाहेब गवळी, माधव काटे, शरद सोनवणे, संजय बडधे, प्रमोद विखे, प्रकाश दहिफळे, वसीम भाई, अरविंद देशमुख, शहाजी जाधव, रणजीत घुगे, आप्पासाहेब मगर, संतोष जाधव आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe