मुंबई – पुणे प्रवास होणार अधिक जलद !

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगाने आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महामार्ग आठपदरीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केला आहे.

सध्या या मार्गावर दरदिवशी १ लाख ५५ हजार वाहने ये-जा करत असून महामार्ग अपुरा पडू लागल्याने सहापदरीऐवजी आठपदरी मार्गाचा प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दोन टप्प्यांत काम पूर्ण करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ९४.५ किमी असून केवळ अडीच तासांत प्रवास करणे शक्य झाले आहे. मात्र महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच अपघातांत वाढ होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

या मार्गाचे पदरीकरण वाढल्यास तीन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने विविध योजना वाहतूक पोलिसांच्या मदतीने राबवल्या असून अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe