LIC Special Plan : आजचा गुंतवा ‘या’ सुपरहिट योजनेत पैसे! महिन्याला मिळेल एक लाखाची पेन्शन

Published on -

LIC Special Plan : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून कोट्यवधी नागरिक एलआयसीची पॉलिसी खरेदी करतात. आता तुम्ही देखील गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत असाल तर एलआयसीने आपली एक योजना आणली आहे.

जर तुम्ही एलआयसीच्या या शानदार पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये पेन्शन मिळेल. जर तुम्हीही अजून या योजनेत पैसे गुंतवले नसतील तर आजच या योजनेत पैसे गुंतवा. LIC ची नवीन जीवन शांती ही सिंगल-प्रिमियम योजना यात पॉलिसीधारकाला सिंगल लाइफ आणि जॉइंट लाइफ डिफर्ड अॅन्युइटी यापैकी एक निवडता येते. हे प्रत्येक महिन्याला अतिरिक्त मृत्यू लाभ प्रदान करते.

जाणून घ्या योजना

खरंतर LIC ची ही वार्षिकी योजना आहे. याचाच असा अर्थ ही पॉलिसी खरेदी करताच पेन्शनची रक्कम निश्चित करता येते. यात तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळण्याची सुविधा मिळते. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध करून दिले जातात.

पहिली एकल जीवनासाठी स्थगित वार्षिकी आणि दुसरी संयुक्त जीवनासाठी स्थगित वार्षिकी आहे. त्याशिवाय पहिल्या पर्यायाखाली तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी पेन्शन प्लॅन खरेदी करू शकता. चांगली पेन्शन मिळवण्यासाठी लोक विविध क्षेत्रात गुंतवणूक करतात.

या पॉलिसीमध्ये कमीत कमी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. समजा तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही चांगल्या पेन्शनसह निवृत्त होऊ शकता. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वार्षिक दर अद्ययावत केले आहेत.

आता पॉलिसीधारकांना प्रीमियमच्या बदल्यात जास्त पेन्शन मिळेल. ज्या लोकांना लवकर निवृत्ती पाहिजे असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो. हे लक्षात घ्या की ही पेन्शन लगेच किंवा 1 ते 20 वर्षांच्या आत कधीही चालू करता येते.

जास्त प्रीमियम

30 ते 79 वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करता येते. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या रकमेवर मर्यादा नसते. एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, समजा तुम्हाला चांगली मासिक पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.

किती होईल फायदा

पॉलिसीनुसार, आता तुम्ही सिंगल लाइफसाठी 10 लाख रुपयांची डिफर्ड अॅन्युइटी पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 11,192 रुपये पेन्शन म्हणून मिळतील. समजा तुम्ही 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1000 रुपये पेन्शन मिळेल.

समजा तुम्हाला 1 लाख रुपये मासिक पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला 12 वर्षांसाठी 1 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हे लक्षात घ्या की 12 वर्षांनंतर, जेव्हा पॉलिसी मॅच्युअर होईल, त्यावेळी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1.06 लाख रुपये पेन्शन मिळेल. समजा तुम्हाला केवळ 10 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 94,840 रुपये मासिक पेन्शन मिळेल.

समजा तुम्हाला केवळ 50,000 रुपये मासिक पेन्शन हवे असेल तर तुम्हाला केवळ 50 लाख रुपये गुंतवावे लागणार आहे. तुम्ही 12 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 50,000 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 53,460 रुपये मिळतील.

LIC सरल पेन्शन प्लॅन

या योजनेमध्ये, तुम्हाला वार्षिक किमान 12,000 रुपयांची वार्षिकी खरेदी करता येईल. या योजनेत गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त मर्यादा निश्चित केलेली नाही, हे लक्षात घ्या. कोणतीही व्यक्तीला या योजनेअंतर्गत वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधारावर एकदा प्रीमियम भरून पेन्शन मिळेल. तसेच ही पॉलिसी खरेदी करून तुम्हाला कर्जाची सुविधादेखील मिळत आहे. या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारक सहा महिन्यांनंतर कर्ज घेता येईल.

समजा तुम्ही LIC च्या या योजनेत तुम्ही कमीत कमी 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुमचे 1,000 रुपये पेन्शन निश्चित केली जाईल. समजा तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले तर तुमची पेन्शन रक्कम प्रत्येक महिन्याला 11,192 रुपये निश्चित करण्यात येईल. भविष्य सुरक्षित करण्यासाठी एलआयसीची ही सर्वात उत्तम योजना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe