नवी दिल्ली भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस फोफावतच चालला आहे. मागील २४ तासांत भारतात तब्बल ४ हजार 213 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
आता भारतात रुग्णांचा आकडा 67 हजार 152 झाला आहे. तसेच मागील 24 तासात जवळपास 97 लोकांचा मृत्यू झाला.
यापूर्वी भारतात यापूर्वी 24 तासात 3900 रुग्ण आढळले होते. त्यामुळे गेल्या 24 तासातील हा रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे.
दिलासादायक बातमी म्हणजे भारतातील निरोगी रुग्णांची संख्या ही मृत्यु दरापेक्षा जास्त आहे. देशातील मृत्युदर सध्या 4% आहे.
तर, निरोगी होण्याची आकडेवारी ही 31% आहे. असे असेल तरी वाढता रुग्णांचा आकडा भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.