Mumbai-Nagpur Bullet Train: मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचे स्वप्न होणार साकार! मुंबईकरांना साईदर्शन होईल 1 तासात शक्य

Ajay Patil
Published:
mumbai-nagpur bullet train

Mumbai-Nagpur Bullet Train:- भारतामध्ये भारतमाला परियोजनाअंतर्गत अनेक मोठमोठ्या एक्सप्रेस वे उभारले जात असून यामुळे देशातील अनेक महत्त्वाचे शहरे एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. तसेच संपूर्ण देशातील राज्य व शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रमध्ये देखील अनेक एक्सप्रेस वे प्रस्तावित असून समृद्धी महामार्ग सारख्या काही महामार्गांचे काम आता पूर्ण होत आले आहे.

यामध्ये समृद्धी महामार्गाचा विचार केला तर नागपूर ते मुंबई  या दोन महत्त्वपूर्ण शहरांमधील अंतर पार करण्यासाठी आता कमीत कमी वेळ लागणार आहे. या प्रकारच्या एक्सप्रेस वे सोबतच अनेक रेल्वे मार्ग व बुलेट ट्रेन प्रकल्प देखील भारतात सुरू असून यामध्ये अहमदाबाद ते मुंबई हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून गुजरात राज्यात या प्रकल्पाचे काम प्रगती पथावर असून महाराष्ट्रात देखील याचे काम सुरू आहे.

अगदी याच पद्धतीने मुंबई ते नागपूर या सुपरफास्ट बुलेट ट्रेनचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थात डीपीआर महाराष्ट्र सरकार व रेल्वे मंत्रालयाला मागच्या वर्षी सादर करण्यात आला आहे. अनेक दृष्टिकोनातून हा बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाचा असणारा असून तो मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर असणार आहे.

 मुंबईनागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचे महत्त्व

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महत्त्वाचा असा मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या साडेतीन तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. आता सध्या विचार केला तर 11 ते 12 तासांचा कालावधी हे अंतर पूर्ण करण्यासाठी लागतो.

तसेच महत्त्वाचे म्हणजे साईनगर शिर्डी दर्शनाकरिता मुंबईवरून यायला सध्या लागणारा सहा तासाच्या कालावधी ऐवजी फक्त एक तास इतकाच वेळ लागणार आहे. त्यामुळे अनेक दृष्टीने हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. जर आपण या बुलेट ट्रेन मार्गाची सुरुवात पाहिली तर ती मुंबई या ठिकाणाच्या बांद्रा कुर्ला अर्थात बीकेसी येथून होणार असून  सध्या होत असलेल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाने व्हाया ठाणे हा मार्ग जाऊन पुढे शहापूर, घोटी तसेच इगतपुरी, नासिक व शिर्डी व शिर्डी या ठिकाणहून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गला समांतर असा नागपूरपर्यंत जाणार आहे.

हा बुलेट ट्रेन मार्ग ७४१ किलोमीटर असणारा असून याकरिता 1.7 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महत्त्वाचे म्हणजे या बुलेट ट्रेन मार्गावर प्रतितास साडेतीनशे किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन चालवता येणे शक्य होणार असल्यामुळे प्रवासाचा प्रचंड प्रमाणात वेळ वाचणार आहे.

यामध्ये जर आपण या बुलेट ट्रेन प्रवास भाड्याचा विचार केला तर सध्या फर्स्ट क्लास एअर कंडिशन प्रवासाचे जे भाडे आहे त्याच्यापेक्षा दीडपट जास्त भाडे द्यावे लागणार आहे. समृद्धी महामार्गाच्या कडेने मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन मार्ग प्रस्तावित आहे. या बुलेट ट्रेन ची सुरुवात बीकेसी या ठिकाणाहून होणार असल्यामुळे मुंबईकरांना अवघ्या एका तासांमध्ये शिर्डी पोहोचता येणे शक्य होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe